मंगळवेढा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा वाटपाचा महात्मा गांधी जयंती निमित्त शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील ८१ गावातील ८२ हजार २१२ खातेदारांना डिजिटल सातबारा मिळणार आहे.
उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार स्वप्नील रावडे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, सुधाकर धाईजे, मंगळवेढा आंधळगाव, बोराळे, भोसे, मरवडे, हुलजंती, पाटकळ, मारापूर या आठ मंडळचे मंडलाधिकारी तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून या सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.
भाळवणी येथे मंडलाधिकारी चंद्रकांत घाडगे, सतीश तलाठी सतीश गुरुपवार समाधान वगरे, संभाजी जाधव, पांडुरंग पडवळे यांच्या हस्ते मोहितेची सुरवात करण्यात आली.
या मोहिमेमध्ये तालुक्यातील ८१ गावातील इतर खातेदार शेतकऱ्यांना मोफत सातबाराचे वितरण करण्यात येत आहे. डिजिटल सातबारा मिळणारे शेतकरी मेटकरवाडी २२७, येळगी २७८, पाठखळ १५४१, गणेशवाडी ७६०, जंगलगी ५३४, ढवळस ७२६, मुंढेवाडी ७७२, पौट ६०५, खडकी ४८६, नंदेश्वर १९५६, शिवनगी ५०२, लवंगी ८७३, रेवेवाडी ५१६, बावची ८२१, जुनोनी ५४१, खुपसंगी १३८०, मुढवी ८८३, अरळी ८९४, कर्जाळ २४१, लेंडवेचिंचाळे ६४१, माळेवाडी २५५, आसबेवाडी २३९, नंदूर १५९२, मारोळी ६४५, ब्रह्मपुरी ११४५, मरवडे १२०५, हिवरगाव ४२५, लमाणतांडा ३४०, हाजापूर ५३८, लोणार ८१७, जालीहाळ ८१२, फटेवाडी ५३३, महमदाबाद हु. ८९२, पडोळकरवाडी ८२६, शेलेवाडी ७२५, ममदाबाद शे. ६७९, अकोले ७८४, भालेवाडी ३७८, कचरेवाडी १२३७, भाळवणी ९३७,
बोराळे १६८५, कात्राळ ७३१, हुलजंती २५१७, धर्मगाव ४२०, डोंगरगाव १०७४, गोणेवाडी १३८८, आंधळगाव १६६१, सलगर बुद्रुक १९२९, गुंजेगाव ११६४, खवे ४४०, बठाण ७१९, कागष्ट ३५४, मल्लेवाडी ६२५, डोणज १३९२, उचेठाण ७६३, शिरशी ८११, शिरनांदगी १०६३, निंबोणी १११४, चिक्कलगी १०३३, माचनूर ७४३, तळसंगी १५०५, लक्ष्मी दहिवडी २३४७, तांडोर ५६३, खोमनाळ १०७२, येड्राव ४४२, सिद्धापूर १०५६, भोसे २९९३, मंगळवेढा ८७९०, देगाव ५४७, सलगर खुर्द ११५०, मारापूर १५५७, सिद्धनकेरी २९१, जित्ती ५३२, रहाटेवाडी ५२६, हुन्नूर १७०२, मानेवाडी ७०४, तामदर्डी ६३९, रड्डे २२४७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.