Prashant Paricharak 
सोलापूर

सोलापूर : दामाजी कारखान्यामुळे परिचारकांना मंगळवेढ्यात विस्तारण्याची संधी

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात अध्यक्षपदी शिवानंद पाटील

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात अध्यक्षपदाची संधी शिवानंद पाटील यांना संधी मिळाली. त्यामुळे आता परिचारक गटाला आगामी 2024 च्या विधानसभेचा विचार करता तालुक्यामध्ये विस्तारण्याची संधी मिळाली.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे रंगीत तालीम मानली जात असल्यामुळे या निवडणुकीवर पुढची बरीचशी गणिते निश्चित केली जात असल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. मा.आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे हे दोघेही भाजपचे असताना देखील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत हे दोघे एकत्र बसून त्यावर तोडगा काढू शकले असते मात्र त्यांच्या समर्थकानी निवडणूक जाहीर झाल्यापासून वेगळे लढण्याची भूमिका मांडली होती.

त्यामध्ये कारखान्यावर कर्ज व इतर मुद्दे प्रशांत परिचारकाच्या कानावर घालून त्यांनी अवताडे गटापासून फडकत घेण्यावर जवळपास निश्चित निश्चित केले मात्र पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी माघार घेतल्यामुळे अवताडे यांचा विधानसभेचा मार्ग स्वीकार झाला असे त्यांचे समर्थक बोलू लागले व त्यांनी कारखान्यांमध्ये समाधानकारक जागा द्याव्यात अशी भूमिका देखील एका गटाने मांडली होती मात्र त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जागा देण्यावर आ. अवताडे राजी नव्हते.परिचारक गटाच्या बैठकीत युन्नुश शेख यांनी आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा देत सुरूवात केली.भालके समर्थकांचे बहुतांश अर्ज यांनी बाद झाल्यामुळे या गटातील काहींना जवळ करत दोघांनी मिळून समविचारी आघाडी स्थापन करत आ.आवताडेना यांना आव्हान दिले.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पंढरपूर मंगळवेढा हा नवीन मतदार संघ अस्तित्वात आला त्यानंतर या मतदारसंघात पहिले आमदार होण्याचा मान स्व भारत भालके यांना रिडालोस मधून मिळाला परंतु 2014 साली भालके यांनी रिडालोस सोडली होती त्या जागेवर प्रशांत परिचारक यांनी प्रयोग केला मात्र तो यशस्वी ठरला नाही.2019 ला परत रयत क्रांती मधून स्व. सुधाकरपंत परिचारक यांना संधी दिली तोही प्रयत्न अयशस्वी झाला सलग तिने निवडणुका वेगवेगळ्या पक्षात लढून भालके हे यशस्वी ठरले होते.

परिचारकांच्या विधानसभेतील मंगळवेढ्यातील मतदार हाच अडसर सर्वात मोठा अडसर होता. मंगळवेढ्यातील मतदारांना नेता आणि मतदान हे थेट समीकरण लागते कारण काल पर्यंत परिचारक यांनी त्यांचा गट मंगळवेढा मध्ये प्रभावीपणे वाढविला नव्हता किंबहुना वाढवण्याची संधी देखील नव्हती त्यामुळे निवडक कार्यकर्ते, निवडक मतदार हेच समीकरण झाले. त्यामुळे त्यांच्या गटाचा प्रभाव मंगळवेढ्यात वाढला नव्हता किंबहुना वाढवण्यास संधी देखील मिळाली नाही अशी परिस्थितीत दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना संधी मिळाली. शिवानंद पाटील हे सर्वसमावेशक प्रभावी व्यक्तिमत्व आहे मानले जाते.

शिवाय यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये, दामाजी कारखान्यावर संचालक म्हणून काम केल्यामुळे त्यांच्या कामाचा सर्वांनाच अनुभव व परिचारकांचे सुरुवातीपासून निष्ठावंत सहकारी मानले जातात दामाजी कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता शिवानंद पाटीलांना परिचारक यांचे मार्गदर्शन कारखाना चालण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. अध्यक्षपदातील त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशक असल्याने शेतकरी, सभासद यांच्या पसंतीला पात्र ठरले त्यातूनच कारखान्यासाठी लागणारे आर्थिक मदत व व्यवस्थापन या सर्वच आघाड्यावर त्यांना परिचारकावर अवलंबून राहावे लागणार आहे.

त्यातूनच परिचारकांना तालुक्यामध्ये शिवानंद पाटील यांच्यामुळे विस्तार करण्यासाठी संधी देखील मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष तानाजी खरात यांना भालके गटातून उपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली आहे. पोटनिवडणूक आणि विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर भालके गटात मरगळ आली त्यांच्या निवडीमुळे देखील भालके गटाला तालुक्यामध्ये ऊर्जीत अवस्था मिळाली.

परंतु भविष्यात भालके गटाची राजकीय बांधणी मंगळवेढ्यात कशी होते यावर बरेच अवलंबून आहे मात्र 2024 च्या विधानसभेचा विचार करता राज्यात झालेला सत्ता बदल व वरिष्ठ पातळीवर त्यांचे असलेले संबंधाचा विचार करता सलग विधानसभेच्या सलग दोन पराभवानंतर पुन्हा एकदा चाचपणी करू शकतील अशी परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली. मात्र त्यांना तालुक्यातील प्रश्नासाठी पुढाकार घ्यावा लागेल असे त्यांच्या समर्थकातून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT