food sakal
सोलापूर

Solapur : गाताचीवाडी येथे शंतनू पाटील यांची उद्योगात भरारी

मिलूप फूड्सच्या उत्पादनांची ग्राहकांना भुरळ

प्रशांत काळे

बार्शी : कोरोना महामारीतच ऑक्टोबर २०२१ मध्ये गाताचीवाडी (ता. बार्शी) येथील तरुणाने मोठा उद्योजक उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रत्यक्षातही उतरवले. शंतनू पाटील  असे या तरुण उद्योजकाचे नाव आहे.

ज्वारीपासून बिस्कीट, पोहे, नाचणी, चिवडा बनवण्याचे युनिट उभा केले असून सुमारे दोन कोटी रुपयांची गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरु आहे. गाताचीवाडी येथे उभारण्यात आलेला या प्रकल्पाला मिलूप फूड्स या नावाने ओळख देण्यात आली असून मिलूप फूड्सच्या उत्पादनांची राज्यभरातील ग्राहकांना भूरळ पडली आहे. पर्यावरण विषयात बीई करून  शंतनू  पाटील यांनी  स्कॉटलंडमध्ये मास्टर केले.  शेती व पर्यावरणविषयी आवड असल्याने  याच क्षेत्रात  करियर करण्याचे त्यांनी ठरवले. स्कॉटलंडमध्ये असतानाच त्यांनी  ज्वारी प्रक्रिया  उद्योगाविषयी अभ्यास  करण्यास सुरवात केली.

भारतात  परतल्यानंतर थोडाही  वेळ न दडवता त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. ज्वारी पासून  बाय-प्रॉडक्ट बनवण्याची संकल्पना त्यांना  सुचली  व त्या दिशेने  वाटचाल सुरू झाली. व्यवसाय सुरू करताना बेसिकपासून ॲडव्हॅन्सपर्यंतच्या सर्व बाबींचा अभ्यास केला. प्रकल्प उभारणीसाठीची  जागा, कच्चा माल, भांडवल, मार्केटिंग, बाजारपेठ, ग्राहकांमधील जागरूकता याच  अभ्यास केला. यासाठी पुण्यात  काही  खाजगी कंपन्यांमध्ये  मार्केटिंगचे कामही केले. मराठवाड्याची सर्वात जुनी बाजारपेठ बार्शी आहे. शिवाय सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादनात  अव्वल आहे. त्यात मालदांडी, दगडी, ज्यूट इत्यादीचा समावेश आहे. बार्शीची  शाळू  ज्वारी जगभर प्रसिद्ध आहे. आरोग्याच्या दृष्टीने या ज्वारीचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची काळजी मिटली.

प्रकल्प उभारणीसाठी लागणारे भांडवल अधिक होते. अशावेळी  केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनेअंतर्गत सुमारे ५० लाखांपर्यंत अनुदान मिळाले  तर काही रक्कम कर्जाने घेतली. सध्या कुकीज, पोहे, आटा, रवा अशा सर्व मशिन्सने परिपूर्ण प्लांट दिवसाला १ ते १.५ टन प्रत्येकी क्षमतेचे काम करण्यास सक्षम आहे. मार्केटिंगसाठी पुणे, मुंबई, बंगलोर सारख्या मोठ्या  शहरांपुरताच मर्यादित विचार न करता ज्वारी हे प्रमुख अन्न असलेले ग्रामीण भागापासून मार्केटिंगला सुरवात करण्याचा निर्णय त्यांनी  घेतला.

ज्यामुळे भाकरी व्यतिरिक्त इतर माध्यमातूनही लोकांना ज्वारी नाचणीचा समावेश आहारात करता येईल व लोकांना ज्वारीचे आहारातील महत्त्व कळून ज्वारीची व्याप्ती वाढेल  हा त्यामागचा उद्देश होता. यशस्वी प्रकल्प  उभारणीसाठी लागणारी योग्य अशा टिमही बांधणी  शंतनू पाटील यांनी  केली. ज्यात टेक्निकल हेड, मार्केटिंग हेड, फूड टेक्नॉलॉजिस्ट, डाएटीशिअन यांचा समावेश आहे. शंतनू पाटील  यांचे  वडील  संजय पाटील कृषी पदवीधर असून उत्पादनांसाठी लागणारा सर्व कच्चा माल मिळवून देण्याचे काम ते पाहतात. ऋतुजा पाटील या डिझाईन व मार्केटिंग हेड आहेत. शुभांगी पाटील या  डाएटीशिअन असून प्रॉडक्ट डेव्हलपमेंट त्या पाहतात.

तीन फ्लेवर्समध्ये उत्पादने

गाताचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाला मिलूप फूड्स या नावाने ओळख देण्यात आली. मिलूप फूड्स अंतर्गत ज्वारी, नाचणी, बाजरी  या पारंपरिक तृणधान्यापासून कुकीज, पोहे, रवा, पीठ, इडली रवा इत्यादीचे उत्पादन  घेतले जाते. त्याचबरोबर इतर कंपन्यांना त्यांच्या  ब्रँड अंतर्गत  उत्पादने तयार करून दिली जातात. सद्यपरिस्थीतीला मिलूप फूड्सचे ज्वारी-नाचणीपासून बनवलेली  तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समधील ज्वारी-नाचणी कुकीज, ज्वारी पोहे आणि ज्वारी चिवडा इत्यादी उत्पादने 'ऑल  सो ग्रेट' या ब्रँड नावाने ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

देशभरात चव आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली बार्शीच्या शाळू (ज्वारी)ला वेगवेगळया उत्पादनाच्या  माध्यामातून  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून  देण्याचा  आपला  मानस आहे.

- शंतनू  पाटील,उद्योजग, गाताचीवाडी, ता. बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT