पूर ग्रस्तांना मदतीसाठी सोलापूरची मनसे धाऊन आली आहे
पंढरपूर (सोलापूर): कोल्हापूर जिल्ह्यात पूराने थैमान घातले. अनेकांचे संसार पाण्यात बुडाले आहेत. अशा पूर ग्रस्तांना मदतीसाठी सोलापूरची मनसे धाऊन आली आहे. येथील गरजू लोकांना एक हजार चादरींचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे चे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिली.
कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णेला मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले आहे. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पूरग्रस्तांना 1000 चादरीची मदत पाठवण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी 1000 सोलापूरी चादरी घेऊन सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहन रवाना झाले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा शाडो सहकार मंत्री दिलीप बापू धोत्रे यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचती करण्यात येत आहे. तसेच येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक कंबरडे देखील मोडले आहे. राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने एक माणुसकीचा हात म्हणून आपण मदत पाठवत आहोत. तसेच आजपासून वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळ्या माध्यमातून देखील मदत पाठवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्राकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, सचिव अभिषेक रमपुरे, गोविंद बंदपट्टे, समर्थ ओझा, पवन दोरकर, अभिजित डूबल इत्यादी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.