MPSC Exam esakal
सोलापूर

Solapur : ‘MPSC’चा निर्णय तरूणांच्या जिव्हारी

टंकलेखनाची परीक्षा ७ एप्रिलला अन्‌ डेमो दिला दोन दिवसांपूर्वी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मंत्रालयीन लिपिक व कर सहायकांना पूर्व आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ‘टायपिंग’ची परीक्षा उत्तीर्णची अट आहे. एक हजार ४६४ जागांसाठी लेखी परीक्षेचे दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर हातावरील पोट असलेल्या पालकांनी आणि दिवसरात्र शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनी मुला-मुलीला सरकारी नोकरी लागणार म्हणून पेढे वाटले.

पण, २९ मार्च रोजी ‘एमपीएससी’ने नवीन आदेश काढला आणि अनेकांची झोपच उडाली. उमेदवारांनी त्या बदलाला विरोध करीत टायपिंगच्या ‘जीसीसी’ व ‘टीबीसी’प्रमाणेच ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी आयोगाच्या सचिवांकडे केली आहे.

कोरोनाच्या महामारीची दोन वर्षे, मागील पाच-सहा वर्षांपासून सरकारी नोकरभरती नाही. अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ७५ हजार पदांची शासकीय मेगाभरतीची घोषणा केली. ‘एमपीएससी’च्या माध्यमातून भरली जाणारी १०० टक्के पदांची भरती करण्याचा सकारात्मक निर्णय झाला.

त्यामुळे लाखो तरूणांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि रात्रंदिवस अभ्यास करणारा आपला मुलगा आता सरकारी नोकरीला लागेल व आपली वणवण थांबेल, या आशेने आई-वडिलांनाही आनंद झाला. पण, अचानकपणे निघालेल्या ‘त्या’ आदेशाने सरकारी नोकरीचे स्वप्न अपूर्णच राहील,अशी चिंता अनेकांना लागली आहे. परीक्षेसंदर्भात अचानक असा निर्णय घेतल्याने विद्यार्थी हवालदिल झाले.

राजकीय नेते तरूणांची बाजू घेणार का?

‘एमपीएससी’च्या तरूणांच्या अडचणीसंदर्भात आजवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार गोपिचंद पडळकर, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांनी वेळोवेळी सकारात्मक तोडगा काढला.

त्या तरूणांना साथ दिली. पण, आता पूर्व व लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अडचणीतील ‘त्या’ तरुणांची बाजू कोण घेणार, राजकीय नेते निवडणुकीच्या तोंडावरच आंदोलन करतात का, ते नेते तरूणांच्या जिव्हारी लागलेला ‘एमपीएससी’चा ‘तो’ आदेश मागे घ्यायला भाग पाडतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

परीक्षेला आठ दिवस शिल्लक असताना निर्णय....

१६ नोव्हेंबर २०२१ रोजी आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकानुसार टंकलेखन चाचणीचे स्वरूप व निकष ठरले. ३ एप्रिलला पूर्व व १३ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्य परीक्षा झाली. ‘मुख्य’चा निकाल डिसेंबर २०२२ मध्ये जाहीर झाला आणि ७ एप्रिल रोजी टायपिंगची परीक्षा होणार आहे.

मात्र, २९ मार्च २०२३ रोजी ‘एमपीएससी’ने परीक्षेचे नवीन स्वॉप्टेवअर (डेमो) उमेदवारांना पाठवले. मराठीतून परीक्षा आणि डेमो हिंदीतून (remington, indic input) अशी अवस्था आहे. मराठी टायपिंग व हिंदी टायपिंगचे ‘की’ (बटणे) काहीशी वेगळी आहेत. त्यात पुन्हा शब्दांची संख्या दुप्पटच.

नवीन बदलानुसार उतारा वाचून दहा मिनिटात मराठीचे तब्बल ३०० शब्द व इंग्रजीचे ४०० शब्द टाइप करावे लागतील. त्यामुळे दोन कठीण टप्पे पार केलेल्यांसाठी त्यांच्या ‘आयुष्याची’च परीक्षा असणाार आहे. या परीक्षेत वयोमर्यादा संपणारे अनेकजण आहेत. त्यामुळे सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT