siddhrameshwar yatra esakal
सोलापूर

सोलापूर : सिद्धरामेश्‍वर यात्रेला प्रशासनाची केवळ शंभरजणांना परवानगी

किमान चारशेजणांची उपस्थिती आवश्‍यक; मानकरी २५१, मंदिर समिती कर्मचारी १५०

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या महायात्रेत(shri siddhrameshwar yatra) सेवा बजाविण्यासाठी ८५ कुटुंबातील तब्बल २५१ सदस्यांची उपस्थितीत धार्मिक विधीसाठी आवश्‍यक असते. तर मंदिर समितीमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १५० इतकी आहे. धार्मिक विधीसाठी व मंदिरातील नियोजन असे एकूण ४०० सदस्यांसाठी परवानगी आवश्‍यकता असता महापालिका प्रशासनाकडून(solapur carporation ) केवळ १०० जणांसाठी परवानगी देण्यात आली आहे. किमान चारशे जणांना परवानगी देणे आवश्‍यक आहे.(Solapur municipal administration has allowed only 100 people in siddhrameshwar yatra)

गतवर्षी कोरोनाच्या सावटाखाली संक्षिप्त स्वरुपात यात्रा साजरी करण्यात आली. तरी या यात्रेत सहभागी होण्यासाठी मानकऱ्यांना २०० पास देण्यात आले होते. तर मंदिर समितीने १५० कर्मचाऱ्यांसाठी पासची मागणी केली होती. ५० पास दिले गेले होते. तरीदेखील गतवर्षी धार्मिक विधी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक मानकरी पासविना राहिल्याने विधींना वेळ लागला. यंदाही प्रशासनाने या पासच्या संख्येत कात्री लावल्याने सातही नंदीध्वज मानकऱ्यांमध्ये पाससाठी गोंधळ उडाला आहे. तर भाविकांना दर्शनासाठी यात्राकाळात चार दिवस श्री सिद्धेश्‍वर मंदिर खुले ठेवण्यात आल्याने येथील नियोजनासाठी आवश्‍यक मनुष्यबळाची अडचण मंदिर समितीला जाणवणार आहे.

श्री सिद्धरामेश्‍वर महायात्रेतील धार्मिक विधी परंपरेप्रमाणे होण्यासाठी किमान ३५० मानकऱ्यांना पास देणे आवश्‍यक आहे. ५० मानकऱ्यांमध्ये यात्रा अशक्‍य आहे. त्यासाठी पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त यांची भेट घेतली आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षेत आहोत.

- राजशेखर हिरेहब्बू, नंदीध्वज मानकरी

देवस्थानअंतर्गत १५० कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना नियमांचे पालन करून शिस्तबध्दपणे यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थानसाठी किमान १०० पास देण्याची गरज होती. परंतु ५० पास उपलब्ध झाले आहेत. शासनाच्या या नियमाचे आम्ही पालन करू.

- भीमाशंकर पटणे, श्री सिद्धेश्‍वर देवस्थान यात्रा समिती अध्यक्ष

शुक्रवार पेठेतील थोबडे वाड्यात सोमवारी दुपारी बारा ॲड. रितेश थोबडे यांच्या हस्ते योगदंडाची पूजा करण्यात आली. प्रारंभी योगदंड आणण्याचे मानकरी शिवशंकर कंठीकर यांनी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यातून श्री सिद्धरामेश्‍वरांच्या हातातील योगदंड थोबडे वाड्यात घेऊन आले. सोन्याच्या या योगदंडास चौरंगी पाटावर ठेऊन संबळाच्या निनादात विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवन केले. पाैराहित्य िसद्धेश्‍वर कंठीकर व मंहेतश कंठीकर यांनी केले .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT