सोलापूर

.......अखेर सत्ताधाऱ्यांना जाग, युजर चार्जेस रद्दसाठी बोलावली सभा

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : लोकहिताचा निर्णय असलेला युजर चार्जेसचा प्रस्ताव प्रशासनाकडून वेळेत येऊनही त्यावर निर्णय घेण्यास सत्ताधाऱ्यांकडून चालढकल करण्यात येत होती. यासंदर्भात टीका होऊ लागल्याने अखेर सत्ताधाऱ्यांना जाग आली असून, या संदर्भातील सभा 20 फेब्रुवारीला बोलावण्यात आली आहे. 

हे आधी वाचा - आंधळ दळतयं....

सरसकट युजर चार्जेस होणार रद्द 
अनेक भागात ड्रेनेजची सुविधा नसतानाही युजर चार्जेस घेतला जातो. युजर चार्जेसची रक्कम शासनाकडे भरली असेल तर मिळकतदारांकडून ही रक्कम वसूल करू नये, अशी मागणी वारंवार झाली. यंदा प्रशासनानेच खुल्या जागेवर युजर चार्जेस घेऊ नये असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यावेळी केवळ खुल्याच नव्हे तर सरसकट युजर चार्जेस रद्द करावे,असे धोरण सत्ताधाऱ्यांनी ठरवले. मात्र सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णयच घेतला नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका सुरु झाली. विशेष म्हणजे कॅंाग्रेसची सत्ता होती, त्यावेळी युजर चार्जेस रद्द करण्यासाठी भाजपनेच पुढाकार घेतला होता. आता त्यांचीच सत्ता असूनही निर्णय घेण्यात चालढकल केली जात आहे.

सोलापूरकरांनी घेतली तब्बल साडेचार कोटींची सवलत 
थकबाकी वसुलीसाठी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या 75 टक्के सवलतीमुळे थकबाकीदार मिळकतदारांना तब्बल साडेचार कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. दरम्यान, ही योजना लागू केल्यापासून आतापर्यंत 14 कोटी 25 लाख रुपये वसूल झाले आहेत. 

नागरिकांना मिळाली 4.51 कोटींची सवलत 
आर्थिक वर्षाखेरीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे मिळकतकराची जोरदार वसुली मोहीम सुरु आहे. शास्तीमध्ये 75 टक्के सवलत योजना लागू केल्यानंतर आतापर्यंत 14 कोटी 25 लाख 37 लाख 819 रुपयांची वसुली झाली आहे. सवलत योजनेमुळे महपालिकेला 4 कोटी 51 लाख 26 हजार 358 रुपयांवर मनपाला पाणी सोडावे लागले आहे. 

13 जानेवारीपासून झाली सुरवात 
शास्तीत 75 टक्के सवलत देण्यास 13 जानेवारीपासून सुरुवात झाली. या योजनेची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत आहे. 13 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या जवळपास एका महिन्याच्या कालावधीत शहर विभागातून 7 कोटी 26 लाख 40 हजार 410 रुपये इतका मिळकतकर वसूल झाला आहे. या विभागाला सवलतीपोटी 2 कोटी 22 लाख 40 हजार 907 इतक्‍या रक्कमेवर पाणी सोडावे लागले. हद्दवाढ भागात आतापर्यंत 6 कोटी 98 लाख 97 हजार 409 रुपयांचे कर संकलन झाले असून 2 कोटी 28 लाख 85 हजार 451 रुपये इतक्‍या रक्कमेवर पाणी सोडावे लागले. दोन्ही विभागांत मिळून एकंदर 14 कोटी 25 लाख37 हजार 819 रुपयांची वसुली झाली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT