सोलापूर महापालिकेकडे केवळ चार बालरोगतज्ज्ञ असून, त्यातील एक फुलटाईम तर तीन पार्टटाईम आहेत.
सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येईल अशी शक्यता वर्तविताना, बालकांच्या आरोग्याकडे आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, सोलापूर महापालिकेकडे (Solapur Municipal Corporation) केवळ चार बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) असून, त्यातील एक फुलटाईम तर तीन पार्टटाईम आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेची आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे, याची वस्तुस्थिती समोर आली आहे. (Solapur Municipal Corporation has only four pediatricians and inadequate systems)
सोलापूर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. आता या ठिकाणी उद्योजक वाढू लागले आहेत. तरीही शहरातील 220 झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या जवळपास दोन लाखांपर्यंत आहे. शहरातील सर्वसामान्यांना मोफत व माफक दरात आरोग्य सुविधा मिळवून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. तरीही मागील कित्येक वर्षांत शहरात ना नागरी आरोग्य केंद्र, ना प्रसूतिगृह वाढले. सद्य:स्थितीत महापालिकेची 15 नागरी आरोग्य केंद्रे असून त्या ठिकाणीही डॉक्टर, स्पेशालिस्ट डॉक्टर, तंत्रज्ञांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नगारिकांना पदरमोड करून खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागत आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अनुभव पाठीशी असतानाही महापालिकेने अजून तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात बालरोगतज्ज्ञ नसल्याने तिसऱ्या लाटेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेकडील डफरीन रुग्णालयात एक तर अन्य प्रसूती केंद्रांमध्ये तीन बालरोगतज्ज्ञ काम करीत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील बालरोग निदानाची रुग्णालये व डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्याचे नियोजन सुरू असून, त्याची माहिती मागविली आहे.
- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका
महापालिकेची वैद्यकीय स्थिती
नागरी आरोग्य केंद्रे : 15
प्रसूतिगृहे : 8
बालरोगतज्ज्ञ : 4
शहरातील एकूण बालरोगतज्ज्ञ : 91
शहरातील बालके (0 ते 18 वयोगट) : 2.79 लाख
कोरोनासाठी 17 कोटींची तरतूद
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे यासह अन्य प्रतिबंधित उपाययोजनांसाठी महापालिकेने त्यांच्या बजेटमध्ये 17 कोटींची तरतूद केली आहे. त्यात औषधे, कोव्हिड केअर सेंटर, रुग्णांचे जेवण, आरोग्य साहित्य अशा बाबींचा समावेश आहे. आतापर्यंत जवळपास 25 कोटींहून अधिक रुपये खर्च केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पहिल्या व दुसऱ्या लाटेत खरेदी केलेले बरेच साहित्य खराब झाल्याने आता आणखी नवे साहित्य खरेदी करण्याचे नियोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.