सोलापूर : अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत सोलापूर महापालिकेत 32 जागांवर थेट भरती होणार आहे. त्यासाठी तब्बल सात हजार 129 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याची छाननी झाली असून सर्व जागांवरील तब्बल 1077 उमेदवार लेखी परिक्षेसाठी अपात्र झाले आहेत. उर्वरीत 6052 उमेदवारांना लेखी परिक्षेचे पत्र पाठविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध यादीसंदर्भात हरकतीही मागविण्यात येणार आहेत.
हे आधी वाचा - मजूर पदासाठी एम. ए. चा विद्यार्थी
राज्यभरातून आले होते अर्ज
या 32 जागांसाठी सोलापूरसह नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल केलेल्यांकडे या प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र आहे. उमेदवारनिहाय अर्जांची छाननी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र न दिलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली आहे.
हेही वाचा - या शहराचे होणार तीन-तेरा
या ठिकाणी पाहता येईल पात्र-अपात्र उमेदवारांची यादी
शिपाई पदाच्या सात जागांसाठी तब्बल तीन हजार 525, तर कनिष्ठ श्रेणी लिपिकाच्या आठ जागांसाठी दोन हजार 384 अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षेसाठी 150 रुपये शुल्क आहे. दाखल झालेल्या सात हजार 128 अर्जापोटी महापालिकेला 10 लाख 69 हजार 200 रुपये शुल्कापोटी मिळाले. पात्र उमेदवारांची यादी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच संबंधितांना परीक्षेचे पत्र पाठविले जाणार आहे. सोलापूर महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील currant activitis या विभागात ही यादी पहायला मिळेल.
पात्र आणि पात्र उमेदवारांची संख्या (पदनिहाय)
------------------------------------------------------
पदांचे नाव पात्र अपात्र
अवेक्षक 294 46
वीज पर्यवेक्षक 17 11
शिक्षण सेवक 01 17
आरेखक 18 36
मिडवाईफ 21 46
अनुरेखक 25 65
वाहनचालक 20 88
शिपाई 3121 404
लिपिक 2106 278
मजूर 361 42
माळी 38 29
लॅम्प लायटर 30 15
----------------------------------------------------------
एकूण 6052 1077
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.