Solapur Municipal Corporation sakal
सोलापूर

सोलापूर महापालिकेने मुदत संपलेल्या ९५ जागांचा घेतला ताबा

शौचालय, शाळांनंतर आता समाजमंदिरे,अभ्यासिकांचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील जीर्ण शौचालय, पडीक शाळांच्या निविदानंतर आता शहरातील समाजमंदिर व अभ्यासिकांचा लिलाव होणार आहे. शहरातील एकूण १२० जागांपैकी मुदत संपलेल्या ९५ जागा महापालिकेनी ताब्यात घेतल्या आहेत. ही जागा भाडेतत्वावर देण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भूमी व मालमत्ता विभागाने(Department of Property) दिली आहे.

शहरात महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागेवर छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण रोखसाठी त्याच व्यापाऱ्यांना भाडेतत्वावर ही जागा देऊन महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढविण्याची शक्कल आयुक्तांनी लढविली. सर्वप्रथम शौचालय पाडकामाचे काम हाती घेतले. नगरसेवकांनी सुचविलेल्या शहरातील २६ जीर्ण व जुने शौचालय पाडून ती जागा स्वच्छ करण्यात आली.

त्यातील नऊ जागा भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आली. त्यानंतर(solapur corporation) महापालिका प्रशासन शाळा चालविण्यासाठी असक्षम ठरले असून शहरातील मोक्‍याच्या ठिकाणीच्या ठिकाणच्या १३ शाळा(SCHOOLS) २९ वर्षासाठी भाडेतत्वावर देणे म्हणजे विक्रीलाच काढल्यासारखे आहे. त्यापाठोपाठ महापालिकेच्या जागांवर उभारण्यात आलेले अभ्यासिका, समाजमंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक व कार्यकर्त्यांची कार्यालये थाटली होती. आता मुदत संपलेल्या अभ्यासिक व समाजमंदिर महापालिकेनी ताब्यता घेतली असून ११ महिन्यांसाठी भाडेकरारावर देण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया लवकरच होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरातील मुदत संपलेल्या ५७ समाजमंदिरे व ३८ अभ्यासिका महापालिकेनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांची निविदा काढण्यात येईल. महापालिकेचे महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेच्या मालकीची जागा भाडेतत्वावर देणे गरजेचे आहे.

- विक्रम पाटील,

सहाय्यक आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT