chandrakant patil  Sakal
सोलापूर

Solapur: सोलापूर विकास मंचाकडून पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरु करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाचे सोलापूर विकास मंचाने स्वागत केले आहे. लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या परिसरात शासकीय अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय सुरु करावे ही जुनी मागणी होती. पण या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यास मान्यता दिली. त्यानंतर राज्य शासनाने या नव्या महाविद्यालयासाठी आवश्यक निधी मंजूर केला आहे. तसेच अध्यापन आणि अशैक्षणिक कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण झालेली आहे.

या महाविद्यालयासाठी केंद्रीय व राज्य स्तरावरील सर्व मंजुरी, जसे की एआयसीटीई आणि डीटीईची मान्यता मिळवली गेली. महाविद्यालय सुरु करण्याच्या सर्व अटी पूर्ण झाल्याने या शैक्षणिक वर्षातच प्रवेश प्रक्रियेची सुरवात करावी. प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यास इच्छुक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना फायदा होईलच. तसेच या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासातही योगदान मिळेल असे ही मंचाचे विकास जाधव यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT