ppe kit animal  sakal
सोलापूर

Solapur News : लम्पीला रोखण्यासाठी ‘पीपीई किट’ महूदच्या जितेंद्र बाजारेंचा प्रयोग; पशुधन वाचविण्यासाठी उपयुक्त

जिवापाड जपलेल्या पशुधनाला रोगापासून वाचविण्यासाठी या किटच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजी भोसले

सोलापूर - कोरोना संसर्गकाळात ‘पीपीई किट’मुळे अनेकांना संरक्षण मिळाले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. त्याचप्रकारच्या पीपीई किटचा प्रयोग आता लम्पी संसर्गापासून जनावरांचे प्राण वाचविण्यासाठी केला जात आहे. आपले लाखमोलाचे पशुधन वाचविण्यासाठी सांगोला तालुक्यातील महूद येथील जितेंद्र बाजारे या शेतकरी पुत्राने जनावरांसाठीच्या पीपीई किटचा देशातीलच नव्हे, तर बहुधा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे. पशुधन वाचण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या किटचा उपयोग होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे.

जिवापाड जपलेल्या पशुधनाला रोगापासून वाचविण्यासाठी या किटच्या माध्यमातून दिलासा मिळत आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वजनांच्या जनावरांसाठी सुरक्षा कवच ठरणारे हे पीपीई किट बाजारात विक्रीसाठी आणली आहेत.

किटची वैशिष्ट्ये ...

बुरशीनाशक ठेवण्यासाठी कप्पे

किट घातल्यानंतर स्टेथोस्कोप लावता यावा यासाठी जागा

अवघ्या दहा मिनिटांत दोन व्यक्ती किट घालू शकतात

तोंड आणि शौचाची जागा मोकळी

किटसाठी पिवळा, निळा, पांढरा रंग वापरल्याने जनावरे बुजत नाहीत

किंमत २८०० ते तीन हजार रुपये

कोरानातील पीपीई किटबद्दल पंतप्रधान मोदी यांनी फोन करून माझे कौतुक केले आहे. अशी किट बनविणारी महूदची भक्ती गारमेंट ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. पशुधनासाठीचे पीपीई किट लम्पीवर प्रभावी ठरत आहे. या किटच्या पेटंटसाठी प्रयत्न सुरु आहेत. आमच्याकडून सरकारने कीट खरेदी करून ते शेतकऱ्यांना मोफत किंवा माफक दरात द्यावेत.

जितेंद्र बाजारे, पीपीई किट‌ निर्माते, महूद, ता. सांगोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT