गोशाळेच्या माध्यमातून भाकड गायींना आश्रय देत गोनाईन, वॉटर प्युरीफाईंग पावडर सारख्या वेगळ्या उत्पादनासमवेत अंदाजे ३० उत्पादनांची निर्मिती केली आहे.
सोलापूर - वडकबाळ (ता. द. सोलापूर) येथील प्रा. उमा बिराजदार व रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणेतून उभारलेल्या गोशाळेच्या माध्यमातून भाकड गायींना आश्रय देत गोनाईन, वॉटर प्युरीफाईंग पावडर सारख्या वेगळ्या उत्पादनासमवेत अंदाजे ३० उत्पादनांची निर्मिती केली आहे.
विशेष म्हणजे या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या १० महिलांना रोजगार देखील उपलब्ध करुन दिला आहे.
वडकबाळ येथील प्रा. उमा व रुद्रप्पा बिराजदार हे दोघे बहिण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरु करण्याचे काम चालू केले. त्यांच्या या कार्याला जैन समाज बांधवांनी मोठे पाठबळ दिले. या गोशाळेच्या अध्यक्षा म्हणून प्रा. उमा बिराजदार व सचिव म्हणून कविता राठोड या काम पाहतात.
शेतातच चारा पिके घेऊन या जनावरांना चारा उपलब्ध करुन दिला. त्यासोबत शेतकरी भाकड व म्हातारे बैल गोशाळेत आणून देऊ लागले. रुद्रप्पा बिराजदार यांनी पंचगव्य चिकित्सेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर उत्पादन निर्मिती सुरु झाली. शेतकरी डाळिंब, द्राक्षे, मिरचीवर फवारण्यासाठी व खत म्हणून गोमूत्र नेत आहेत. त्यासोबत गोशाळेच्या गांडूळ खताला देखील चांगली मागणी आहे.
गोनाईन हे थ्रीइन वन रसायन मच्छराचा नायनाट, फरशी पुसणे व रुम फ्रेशनर म्हणून काम करते. वॉटर प्युरिफायर पावडरने पाणी स्वच्छ होते. या उत्पादनांना चांगली मागणी आहे. महिला बचतगटाच्या महिलांना रोजगार मिळतो आहे.
काही ठळक नोंदी
जनावरांवर उपचार करुन त्यांची सुश्रुषा
१२ प्रकारचे गोमूत्र अर्काची निर्मिती
१० महिलांना रोजगार
थ्रीईनवन गोनाईनची निर्मिती
वॉटर प्युरीफायरची निर्मिती
कटव्वादेवी गोशाळेची उत्पादने
१२ प्रकारचे गोमूत्र अर्क, गोनाईन, गांडूळ खत, धूप, गोवऱ्या, विभूती, गोजनार्क, गोधृत, कंपोस्ट खत, वॉटर प्युरिफायर, गोमूत्र, शेण.
गाय हा मरेपर्यंत उपयुक्त पशू आहे हे आमच्या उत्पादनांतून हे सिध्द होऊ लागले आहे. गोशाळेचा रोजचा खर्च उत्पादनाच्या मदतीने काढू लागलो आहोत. तसेच लोकांमध्ये जनजागृती होत आहे. शेतकरी गो आधारित शेतीचे महत्व जाणून घेत आहेत. खिलार सारख्या गोवंशाचे संवर्धन होत आहे.
- प्रा. उमा बिराजदार, अध्यक्षा, कटव्वादेवी गोशाळा, वडकबाळ (ता. द. सोलापूर)
अनेक आजारासाठी पंचगव्य चिकित्सा ही उपयोगी ठरते. गो उत्पादनांमध्ये असलेली औषधी गुणांचे संशोधन यातून होत आहे. अनेक आजारांपासून लोक गो औषधीच्या वापरातून मुक्त होतात. तसेच नैसर्गिक जीवनशैलीसाठी गो उत्पादनांचा उपयोग होतो आहे.
- रुद्रप्पा बिराजदार, पंचगव्य चिकित्सक, कटव्वादेवी गोशाळा, वडकबाळ (ता. द. सोलापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.