election sakal
सोलापूर

Solapur Mangalwedha : ग्रामपंचायत निवडणुक चौथ्या दिवशी सदस्यासाठी 347 तर सरपंचासाठी 50 अर्ज

सरपंचाच्या थेट निवडीमुळे गाव गाड्यात सदस्य होण्यासाठी अनेकांची नकार घंटा मिळत आहे.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा- गावगाड्यातील ग्रामपंचायतचा कारभार ताब्यात घेण्यासाठी इच्छुकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात मोठी गर्दी उसळली.चौथ्या दिवशी सदस्य पदासाठी 347 तर सरपंच पदासाठी 50 उमेदवाराचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे यांनी दिली.आज दि.20 अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत आहे.

सरपंचाच्या थेट निवडीमुळे गाव गाड्यात सदस्य होण्यासाठी अनेकांची नकार घंटा मिळत आहे. मात्र सदस्य पदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होत आहे. त्यासाठी त्यांना विविध माध्यमांतून आमीष दाखवून तयार केले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयाची अंतिम मुदत आज दि. 20 ला असल्यामुळे उमेदवारी दाखल अर्ज करण्यासाठी गर्दी होणार आहे.

या कार्यालयातील बहुतांश कर्मचारी हे या निवडणुकीसाठी गुंतल्यामुळे ग्रामीण भागातील इतर कामासाठी आलेल्या नागरिकांना देखील त्यांच्या सहीसाठी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे वारंवार स्पीकर वरून सूचना देत होते.

ब्रह्मपुरीत या ग्रामपंचायत साठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सर्वात जास्त सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज रड्डे ग्रामपंचायतीसाठी 24 तर सरपंच पदासाठी आंधळगाव व महमदाबाद हुन्नूर येथे प्रत्येकी सहा अर्ज आज दाखल झाले.गावनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेले पुढील प्रमाणे कंसात सरपंच पदाचे उमेदवार

शिरसी 18 ,आंधळगाव 19(6),

खडकी 8(1), अकोला 5(1),जंगलगी 23(4), खुपसंगी 19(2), जुनोनी 8(2),महमदाबाद हु 18(6),बठाण 16(1),शेलेवाडी 11(2), उचेठाण 7(3), निंबोणी 19(2), जालीहाळ 5,मुंढेवाडी 7,भाळवणी 13(1),

चिक्कलगी 15(2) ,नंदूर 6(4), हिवरगाव 14(1) ,रड्डे 24(0)लक्ष्मी दहिवडी 19(3),लोणार 22(4),मानेवाडी 1, पडोळकरवाडी 13(2) रेवेवाडी 11(1), देगाव 15(3) ,डिकसळ 9 (1) ,

बालाजी नगर पोटनिवडणूक 2 अर्ज दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT