ujani  esakal
सोलापूर

Solapur News : उजनीतून ना शेतीला ना पिण्यासाठी पाणी

धरणाच्या ४३ वर्षांत आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक; पंढरपूरचा निर्णय उद्या

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर- पावसाळा आता महिनाभरच राहिला आहे, तरीदेखील उजनी १८ टक्क्यांवरच आहे. त्यामुळे धरणाच्या ४३ वर्षांच्या इतिहासात आठ वर्षांचा अनुभव चिंताजनक असल्याने उन्हाळ्यातील संभाव्य टंचाईचा अंदाज घेऊन सध्या ना पिण्यासाठी ना शेतीसाठी पाणी, अशी भूमिका घेतली जात आहे.

आता पंढरपूर व सोलापूर शहरासाठी साधारणत: २० सप्टेंबर दरम्यान एकदाच पाणी सोडले जाणार असून, गुरुवारी (ता. ७) पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील त्यावर अंतिम निर्णय घेतील.

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह धाराशिव, कर्जत-जामखेड, बार्शी, कुर्डुवाडी, करमाळ्यासह जिल्ह्यातील १००पेक्षा अधिक ग्रामपंचायती व सहापेक्षा अधिक ‘एमआयडीसीं’ना आणि अंदाजे २० लाख शेतकऱ्यांना उजनीचाच आधार आहे. १९८० धरणाच्या इतिहासात २०१५-१६ वर्ष संस्मरणीय१९८० मध्ये पहिल्यांदा उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले.

धरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि सर्वत्र हरितक्रांती होण्यास मदत झाली. मात्र, २०१५-१६मध्ये पावसाळा संपला तरीदेखील धरणात १४.६० टक्के पाणीसाठा होता. उन्हाळ्यात धरण उणे ५९ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यावर्षी धरण एवढ्या खालीपर्यंत गेले होते. आता यंदाही तशी परिस्थिती उद्‌भवू शकते म्हणून पाणी सोडण्यापूर्वी कालवा सल्लागार समितीपुढे हा इतिहास मांडला जातोय.

सर्वांत कमी पाणीसाठ्याची वर्षे

(१५ ऑक्टोबरपर्यंत)

वर्ष पाणीसाठा

१९८७-८८ ५७.०७ टक्के

१९९५-९६ ५७. ८१ टक्के

१९९९-२००० ४३.१५ टक्के

२०००-०१ २८.८४ टक्के

२००१-०२ ४३.१५ टक्के

२००२-०३ उणे ७ टक्के

२०१२-१३ १६.२८ टक्के

२०१५-१६ १४.६० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT