canol  sakal
सोलापूर

Solapur News : म्हैसाळच्या पाण्यासाठी गावागावात भांडण;पाण्याचे आवर्तन घेण्यासाठी मारामारी

या योजनेतील शेवटच्या गावांना पाणी मिळत नाही.

महेश पाटील

सोलापूर - युती सरकारच्या काळात सुरू झालेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना आज मितीलाही अपूर्ण आहे.वेगवेगळ्या पक्षांची सरकारे आली अन गेलीही पण या योजनेतील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.अजूनही शेतकऱ्यांना पाण्यासाठी भांडण करण्याची वेळ आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्या तालुक्याच्या दक्षिण टोकाला सांगली जिल्हा हद्दीलगत कांही गावे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात येतात.गेल्या पंधरा दिवसापासून सदरच्या महमदाबाद शिरणांदगी,मारोळी, सलगर बुद्रुक,जंगलगी,बावची,चिक्कलगी या गावांना म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे.

यासाठी शासकीय शुल्कही भरले आहे.तरीही या सदरच्या गावामधील कांहीच गावांना आवर्तन जास्त प्रमाणात दिले जाते अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.कॅनॉल शेजारील गावात जास्त प्रमाणात पाणी मिळते.

या योजनेतील शेवटच्या गावांना पाणी मिळत नाही.असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे पाण्याचे आवर्तन आपल्या गावाकडे वळवण्यासाठी गावागावांमध्ये वादावादी होत आहे.यामध्ये कर्मचारी वर्गामधून पक्षपाती पणा होत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे नियमानुसार सर्व गावांना पाण्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान चालू पावसाळी हंगामातील तीन महिने संपत आले तरीही पावसाने दडी मारली आहे.एकाही नक्षत्र काळात मोठा पाऊस पडला नाही. खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत.रब्बीच्या पेरणीचा हंगामही संपत चालला आहे. बागायती क्षेत्र होरपळत आहे.अश्या परिस्थितीत शेतीसाठी म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी वरदान ठरणार आहे.पण अपुरी राहिलेली कामे,अधिकारी व कर्मचारी वर्गाची कमतरता यामुळे ही योजना सध्यातरी शेतकऱ्यांसाठी मृगजळच ठरली आहे.

तानाजी जाधव,माजी सरपंच सलगर बुद्रुक : सलगर बुद्रुक हे गाव या योजनेतील शेवटच्या गावांपैकी एक गाव आहे.या गावाच्या वरच्या गावांमधील शेतकरी कॅनॉल मध्ये माती टाकून तसेच बॉल फिरवून आमच्या गावाला सदर योजनेचे पाणी येऊ देत नाहीत.शिवाय अधिकारी वर्गही अश्या शेतकऱ्यांवर कार्यवाही करत नाही.शासकीय शुल्क भरूनही पाणी मिळत नाही.त्यामुळे लवकरात लवकर या योजनेतुन सलगर करांना पाणी नाही मिळाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.

राजकुमार बिराजदार माजी सरपंच जंगलगी - म्हैसाळ सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये आमच्या जंगलगी गावाचा देखील समावेश आहे.पावसाभावी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे.त्यामुळे या सिंचन योजनेतील पाणीच या भागातील दुष्काळ घालवू शकते.त्यामुळे या योजनेतुन मिळणारे पाणी मोठ्या दाबाने सुरू रहावे व येथील शेतकऱ्यांचा दुष्काळ संपविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा.

महेश पाटील-कनिष्ठ अभियंता म्हैसाळ सिंचन सांगोला शाखा -मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी सदर आवर्तन चालू करण्यात आले असून महमदाबाद ,जंगलगी, मारोळी या गावातील काही भागात पाणी दिले आहे .

तरी उर्वरित गावांना पाणी देण्याचे नियोजन आहे तथापि कमी विसर्गामुळे एकत्रित मागणी पूर्ण करता येत नाही. तसेच समाधानकारक विसर्ग उपलब्ध झाल्यास उर्वरित गावांना पाणी देण्याचे नियोजन आहे.

तथापि शेतकऱ्यांकडून परस्पर वॉल ओपन करण्यात येत असल्याने पाणी देणेस अडचणी येत आहेत.

तरी सर्व शेतकऱ्यांकडून सहकार्य अपेक्षित असून कोणीही अशी कृती करू नये अन्यथा कडक शासकीय कार्यवाही करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT