Tatyarao lahane sakal
सोलापूर

Solapur : पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा ६७ व्या वर्षी २८ वा वाढदिवस

आईने किडनी दिल्याचा दिवस माढा येथे वाढदिवस म्हणून साजरा

सकाळ वृत्तसेवा

माढा : वयाच्या ६७ व्या वर्षी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा २८ वा वाढदिवस माढ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातील कार्यक्रमासह माढ्यातील पत्रकारांनी रविवारी (ता. १२) साजरा केला. पद्मश्री डॉ. लहाने यांच्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची नेमकी कहाणी आपण पाहूया. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची सेवाभावीवृत्ती संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.

लाखो लोकांना दृष्टी देणाऱ्या डॉ. लहाने यांना त्यांच्या आईने किडनी दिल्याने नवजीवन मिळाले. स्वतःला मिळालेल्या या नवजीवनचा आनंद त्यांनी महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो अंध व्यक्तींच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून दृष्टी देत साजरा करतात. तसे पाहता आपण सर्वजणच स्वतःचा जन्मदिवस हा वाढदिवस म्हणून साजरा करतो.

मात्र पद्मश्री लहाने हे आपला जन्मदिवस वाढदिवस म्हणून साजरा करत नाहीत. १२ फेब्रुवारी १९९५ साली डॉ. लहाने यांच्यावर मुंबईच्या जेजे रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण केली. डॉ. लहाने यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉ. लहाने यांच्या कुटुंबातील चार भाऊ, तीन बहिणी, आई, वडील, पत्नी या सर्वांनीच त्यांना किडनी देऊ केली. यावेळी डॉ. लहाने यांचे भाऊ बाबूराव यांनी आपलीच किडनी डॉ. लहाने यांना देण्याचा आग्रह धरला.

मात्र आई अंजनाबाई यांची किडनी ९८ टक्के जुळल्याने डॉ. लहाने यांना वयाच्या ३९ व्या वर्षी साठ वर्षांच्या आईची किडनी प्रत्यारोपण केली. भाऊ बाबूराव यांचे रक्त शस्त्रक्रियेवेळी डॉ. लहाने यांना दिले. अशा पद्धतीने वयाच्या ३९ व्या वर्षापासून वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत तब्बल चाळीस वर्षांचा सेवाभावी प्रवास डॉ. लहाने हे आईने दिलेल्या किडनीवर करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात लाखो शस्त्रक्रिया ते करतात.

मात्र त्यांनी कधीही आजारपणामुळे यात खंड केला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांसाठी ऊर्जा स्तोत्र असलेले डॉ. लहाने यांची वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी पद्धतीने केलेल्या कामाची कारकीर्द अतिशय उज्वल आहे. आईने किडनी दिल्याने जीवनदान मिळालेले डॉ. लहाने किडनी प्रत्यारोपणाचा दिवसच वाढदिवस म्हणून साजरा करतात. डॉ. लहाने यांच्या पुनर्जन्माची ही कहानी मानवी भावभावनांच्या बंधांनी व सेवाभावी वृत्तीने भरलेली आहे.

डॉ. लहाने यांचा वाढदिवस मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या तसेच आमदार बबनराव शिंदे, डॉ. रागिणी पारेख, अशोक लुणावत, डॉ. बी. ‌वाय. यादव, डॉ. शेळके यांच्या उपस्थितीत साजरा झाला. माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष मदन चवरे, मार्गदर्शक प्रमोद गोसावी, संस्थापक किरण चव्हाण, लक्ष्मण राऊत, हिम्मत जाधव, संदीप शिंदे, अमर गायकवाड, शेखर म्हेत्रे यांनी डॉ. लहाने यांचा हा आगळावेगळा वाढदिवस श्री. जाधव यांच्या निवासस्थानी साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT