solapur airport sakal
सोलापूर

सोलापूरकरांनो, मंगळवारी विमानतळ ते होम मैदानापर्यंत रस्ता राहणार बंद! रस्त्यालगत पोलिस बंदोबस्त; विमानतळावरून कार्यक्रमस्थळी येणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री विमानाने येणार असून त्यांचा ताफा विमानतळावरून थेट होम मैदानावर दाखल होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. 8) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विमानतळ ते होम मैदान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री विमानाने येणार असून त्यांचा ताफा विमानतळावरून थेट होम मैदानावर दाखल होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत विमानतळ ते होम मैदान हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यासाठी या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी विमानतळ, आसरा चौक, महिला हॉस्पिटल, महावीर चौक, आरडीसी कॉर्नर, व्होडाफोन गॅलरी, रंगभवन ते होम मैदान हा सहा किलोमीटर रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. पण, सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा संपूर्ण रस्ता बंद ठेवल्यावर या मार्गावरील वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफा विमानतळावरून निघण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर आणि कार्यक्रम संपण्याच्या ३० मिनिटांपूर्वी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे नियोजन शहर पोलिसांचे आहे.

सहा किलोमीटर रस्ता आठ तास संपूर्णत: बंद करणे सर्वांसाठीच डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे उद्या (सोमवारी) वाहतूक पोलिस त्यासंदर्भातील अंतिम निर्णय घेतील. पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार तर तो रस्ता सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहील, असेच नमूद आहे. याशिवाय शहरातील रंगभवन ते डफरीन चौक, पार्क चौक ते मार्केट पोलिस चौकी, चार पुतळा ते डफरीन चौक हे मार्ग देखील मंगळवारी त्या वेळेत वाहतुकीसाठी बंदच राहणार आहेत.

दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी मंगळवारी शहर पोलिसांचा जवळपास दीड हजाराचा बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यात वाहतूक पोलिसांचे २०० कर्मचारी वाहतूक नियमनासाठी नेमले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी, बंद केलेल्या रस्त्यावर, बसमधून महिला लाभार्थी ज्याठिकाणी उतरतील, तेथे देखील हा बंदोबस्त नेमला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : खडकवासला जवळील डोणजे गावचे माजी उपसरपंचाची हत्या

SCROLL FOR NEXT