solapur sakal
सोलापूर

Solapur : नवरात्रोत्सवात दररोज पाचशे कन्यांचे पूजन

सच्चियाय माता (ओसिया) ही मारवाडी, जैन समाजाची कुलदेवी मानली जाते.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

सोलापूर - स्त्रीमधील देवी महात्म्य जपणाऱ्या मारवाडी, जैन समाजाच्या वतीने नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध समाजातून एकत्रित आलेल्या मुलींचे पाय धुवून तिची पूजा करतात. कन्यापूजनाबरोबरच महाभोजन देऊन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. या नऊ दिवसांत जवळपास सहा हजार मुलींचं अशा पद्धतीने स्वागत होत असून दररोज पाचशे मुली या सोहळ्यात जमून सन्मान स्वीकारत आहेत.

सच्चियाय माता (ओसिया) ही मारवाडी, जैन समाजाची कुलदेवी मानली जाते. जोधपूरपासून ६५ किलो मीटरवर तिचे मूळ मंदिर आहे. सोलापुरात बहुतांश जैन, मारवाडी समाजात या देवीची पूजाअर्चा करून वर्षभरातील सण-उत्सव साजरे करतात.

या नऊ दिवसांत मंगळवारी देवीची नक्षत्र आरती, बुधवारी जलाभिषेक, गुरुवारी महिलांचा हळदी - कुंकू, शुक्रवारी पाटलीपुष्प अर्चना, तर शनिवारी सुंदरकांड होणार आहे. रविवारी शतचंडी हवन होणार आहे.

हळद-कुंकू लावून पूजा

नवरात्रोत्सवात लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात अट्टल माहेश्वरी भवन येथे नऊ दिवस हा उपक्रम होतोय. दररोज विविध समाजातील जवळपास ५०० मुलींना हळदी - कुंकू लावून पूजा केली जात आहे. विजयकुमार व्यास यांच्या पौरोहित्याखाली कन्यापूजन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Kantara Chapter 1: तारीख ठरली! 'या' दिवशी जगभरात प्रदर्शित होणार 'कांतारा चॅप्टर १'; उरले किती दिवस?

Latest Maharashtra News Updates : मनसे पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT