Park Chowk 
सोलापूर

"या' शहरवासीयांनी घेतलंय मनावर... घरातच लॉकइन राहून करणार कोरोनाला हद्दपार! कसे? वाचा सविस्तर

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नेहमी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी दिसणारी गर्दी आज (शुक्रवारी) दिसली नाही. विनाकारण किराणा, औषधे, भाजीपाल्याच्या बहाण्याने बाहेर पडणारे तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मात्र कुठेच दिसून आली नाही. मोठ्या चौकांमध्ये पालिसांचा बंदोबस्त, मात्र नागरी वसाहतीत पोलिसांची एखाद-दुसरी रपेट. पोलिसांना खाकीचा धाक दाखवण्याची गरजच पडली नाही; कारण शहरवासीयांनी मनावर घेतलंय, की कोरोनाला हरवायचे असेल, त्याची साखळी तोडायची असेल तर आपल्याला घरातच लॉकइन होणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शहरात चिडीचूप शांतता पसरल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. 

हेही वाचा : दहा दिवसांत पाच हजार ऍटिजेन टेस्ट 

जगाला अपरिचित असलेल्या कोरोना नावाच्या विषाणूने सोलापूर शहरात अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. 22 मार्चपासून जवळपास तीन महिने लॉकडाउन पाळण्यात आला. तेव्हा कोरोराचा कहर काय असतो, याची माहिती नसलेले शहरवासीय या काळात लॉकडाउनच्या नियमांना पायदळी तुडवत विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसले होते. आता शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेचार हजारांपर्यंत तर साडेतीनशेपर्यंत मृत्यूचा आकडा पोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून, प्रशासनाने पुन्हा शुक्रवारपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. शहरवासीयांनीही आता गेल्या लॉकडाउनच्या वेळी केलेली चूक आता करायची नाही, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरातच राहून प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे ठरवल्याचे सुनसान रस्ते पाहून दिसून आले. जेथे पोलिसांचा बंदोबस्त नाही, त्या परिसरातील नागरिक स्वत:हून रस्त्यावर आले नाहीत. 

हेही वाचा : बार मॅनेजरचा खून करणारा वस्ताद सापडला सांगलीच्या कदमवाडीत 

शुक्रवारी शहरातील बाजारपेठा, भाजी मंडई, किराणा दुकाने बंद होती. अक्कलकोट रोड एमआयडीसीतील उद्योगही बंद असल्याने कामगारांची वर्दळ नव्हती. जुने विडी घरकुल, नीलमनगर परिसर, कुमठा नाका, सत्तर फूट रोड, अशोक चौक, कन्ना चौक आदी पूर्वभागातील तसेच नवी पेठ, शिवाजी चौक, पार्क चौक, सात रस्ता, रंगभवन, रेल्वे स्थानक, मधला मारुती, कोंतम, चौक, विजापूर वेस, जुळे सोलापूर आदी परिसरात सन्नाटा पसरलेला होता. चौका-चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, पासधारक व मेडिकलसाठीचे प्रिस्क्रिप्शन पाहून सोडण्यात येत होते. 

पोलिसांवरील ताण कमी 
शहरवासीयांनी स्वत:हून लॉकडाउन पाळत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. गोंगाट, गर्दी, गजबजणाऱ्या परिसरात निरव शांतता पसरली होती. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या चौकांमध्ये होता. त्यांना कोरोना वॉरिअर्सची चांगली साथ मिळाली. नागरी वस्त्यांमध्येही नागरिक बाहेर पडताना दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाल्याचे चित्र होते. तरी काही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी दंडुका न वापरता समजावून सांगून परत पाठवत होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT