Devendra Fadanvis : अनगर ता मोहोळ येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा फेरसर्वे करावा व ते योग्य ठिकाणी देण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन मोहोळ तालुका भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोहोळ येथे देण्यात आले.
अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. परंतु ते गैरसोयीचे व तालुक्याच्या एका टोकाला आहे. सर्वसामान्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करणे अडचणीचे आहे. अनगर ला जायचे म्हणले तरी अगोदर तालुक्याच्या ठिकाणी मोहोळ ला येऊन पुन्हा अनगरला जावे लागते. या कार्यालयाला पेनुर, नरखेड, शेटफळ व अनगर ही चार महसुली मंडळे जोडली आहेत.
पेनुर हे पंढरपूरच्या सीमेजवळ आहे तर शेटफळ ची तीच अवस्था आहे शेटफळ नरखेड पेनुर या मंडळातील गावांना मोहोळ सोईस्कर आहे मोहोळ आल्यावर विविध कार्यालयातील कामे एकाच वेळी होतात हे कार्यालय अनगर ला मंजूर झाल्याने जनतेत प्रचंड रोष आहे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन स्वीकारल्या नंतर "योग्य तो मार्ग काढू" असे उपमुख्यमंत्री म्हणाल्याचे भाजपचे माजी शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी सांगितले.
निवेदनावर तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, सुशील क्षीरसागर, अविनाश पांढरे, ब्रह्मदेव गोफने, गणेश झाडे, माऊली भगरे,रमेश माने, नागनाथ क्षीरसागर, संजय वाघमोडे, विकास वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान याच कार्यालया संदर्भात मोहोळ वकील संघाच्या वतीने ही निवेदन देण्यात आले.अनगर येथील अप्पर तहसील कार्यालया संदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मोहोळ येथे निवेदन देताना कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.