Journalism  sakal
सोलापूर

Solapur : 'सकाळ'ची पत्रकारिता सामाजिक भावनेतून ; तहसीलदार अभिजीत पाटील

महूद येथे सकाळ रिलिफ फंडातून विहीर खोदायच्या कामाचा शुभारंभ

उमेश महाजन

महूद  :  'सकाळ' सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पत्रकारिता करीत आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयोगी पडणारे विविध उपक्रम 'सकाळ' राबवित आहे. सकाळ रिलिफ फंडातून महूद येथे  घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा विहीरीच्या माध्यमातून येथील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या उपक्रमास प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास  सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.

महूद येथील वाढत्या लोकसंख्येमुळे येथील पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे येथे आणखी एक नवीन पाणीपुरवठा विहिरीची आवश्यकता होती. त्यासाठी महूद ग्रामपंचायतीने सकाळ रिलीफ फंडाकडे मदत मागितली होती. त्यानुसार

सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून येथे घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा विहिरीच्या कामाचा प्रारंभ तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त गटविकास अधिकारी विकास काळोखे, सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी, वितरण व्यवस्थापक राम गावडे, सोलापूर येथील उद्योजक प्रमोद तमन्नवार, सरपंच संजीवनी लुबाळ,उपसरपंच वर्षा महाजन उपस्थित होते.

यावेळी निवासी संपादक अभय दिवाणजी यांनी यावेळी सकाळची भूमिका विशद केली.तर तहसीलदार अभिजीत पाटील यांनी 'सकाळ'च्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात अतिरिक्त गटविकास अधिकारी विकास काळोखे, ॲड्.धनंजय मेटकरी, माजी सरपंच व चला जाणूया नदीला उपक्रमाचे समन्वयक बाळासाहेब ढाळे,ग्रामविकास अधिकारी जयवंत लवटे आदींनी विचार व्यक्त केले. 

या कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत घाडगे, जयवंतराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष धनंजय पाटील, ॲड्. विजय धोकटे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अभिषेक कांबळे, कैलास खबाले, अंकुश येडगे,महेंद्र बाजारे,संजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भीमराव ढाळे, दिलीप नागणे, समाधान येडगे, यशवंत खबाले, महादेव येळे,

संजय पाटील, नैनेश कांबळे, धनाजी कांबळे, दिगंबर येडगे, हरिदास येडगे, राजेंद्र देशमुख, कल्याण लुबाळ,दादासाहेब जाधव, ग्रामविकास अधिकारी शंकर मेटकरी,आत्माराम कोळी, बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत सरतापे, भागवत सरतापे, देविदास गोफणे, पोलीस पाटील लहू मेटकरी, अनिकेत महाजन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय जाधव,

दीपक धोकटे, शैलेश सरतापे, प्रकाश येडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सकाळ बातमीदार दत्तात्रय खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन उमेश महाजन यांनी केले तर आभार जयवंत लवटे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shahajibapu Patil: काय झाडी काय डोंगर... फेम शहाजीबापू पाटील यांचा पराभव करणा-या युवा आमदाराने केली अनोखी घोषणा

Sharad Pawar : राज्यामध्ये लागलेला निकाल अनपेक्षित आहे

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : कोकण कधीच ठाकरेंचं नव्हतं- निलेश राणे

SCROLL FOR NEXT