solapur shah family rahul shah 51 birthday mangalwedha development  sakal
सोलापूर

Solapur News : मंगळवेढ्याच्या जडणघडणीत शहा कुटुंबाच्या तिन्ही पिढीचा वाटा परिचारक

मंगळवेढ्याच्या जडणघडणीत शहा कुटुंबाच्या तिन्ही पिढीचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार मा.आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : मंगळवेढ्याच्या जडणघडणीत शहा कुटुंबाच्या तिन्ही पिढीचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार मा.आ. प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले. रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण व रतनचंद शहा बॅकेच्या क्युआर कोड,व भारत बिल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी दिपक साळुंके-पाटील हे होते.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील,जेष्ठ नेते बबनराव आवताडे,जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव,उमेश पाटील,लतीफ तांबोळी,रामचंद्र वाकडे,

रामचंद्र जगताप,सुभदा शहा,निला आटकळे,अरूणा माळी,आश्विनी शहा, दामाजीचे संचालक पी.बी.पाटील,औदुंबर वाडदेकर,प्राचार्य एन.बी.पवार अरूण किल्लेदार,मुझ्झफर काझी,रामकृष्ण नागणे,रामेश्वर मासाळ,बजरंग ताड चंद्रशेखर कौडूभैरी,सोमनाथ माळी,प्रतिक किल्लेदार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार परिचारक म्हणाले की तुम्ही जेवढे एकत्र आले असाल तेवढे आम्ही दोघे एकत्र आलो.त्यांची आणि आमची दुःखे सारखे आहेत पण राजकारणाचे नव्हे तर बॅकेची, राहुल शहा हे मनस्वी वेगळ्या स्वभावाचे आहेत,वाढवडिलानी सुरू केली संस्था जबाबदारी चालवावी या धोरणेने ते काम करीत आहेत.

बँक चालवणे व इतरांना मदत करणे पूर्वी आनंद वाटायचे,सध्या कर्ज घेणारा निवांत झोपलेला असतो मात्र देणारा जागो असतो. आरबीआयच्या नियमानुसार कर्जाची वसुली वेळेत झाली नाही तर निर्बंध लादले जातात आणि या निर्बंधाला पूर्वी मॅनेजरला सामोरे जावे लागत होते पण आता चेअरमनलाही त्याला सामोरे जावे लागत आहे बँकेचा चेअरमन म्हणजे एक काटेरी मुकुट आहे.

राहुल शहा ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले की शेडजीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत बँकेच्या आधाराने मोठे झालो त्यांनी बँकेच्या अडचणीच्या काळात सावली म्हणून उभे राहण्याची गरज आहे. बळीराम साठे म्हणाले की, तीन पिड्यांची परंपरा असलेल्या शहा कुटुंबांनी शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.

दीपक साळुंखे पाटील, मंगळवेढा शहराचा विकास लिहीत असताना शहा व मारवाडी वकील या दोन नावा शिवाय इतिहास पूर्ण होत नाही. बँकेची जबाबदारी राहुल शहा यांच्याकडे पडल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी नेटाने सांभाळली आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल शहा यांचा सपत्नीक मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रशेखर कौडूभैरी यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे आणि विनायक कलुबर्मे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT