Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory  sakal
सोलापूर

Solapur : दामाजीचे हंगाम अखेरच्या ऊसबिल खात्यावर वर्ग ; अध्यक्ष पाटील

सभासद व कर्मचाऱ्यानी संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केल्याने कारखाना दिडपट क्षमतेने चालविला.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील 1 ते 21 फेब्रुवारी पर्यत शेवटच्या पंधरवाडयाचे ऊसबील प्रती टन 2300 प्रमाणे ऊस पुरवठा शेतक-यांचे मागणी व सोयीनुसार बँकामधील खात्यावर वर्ग केले असून कारखान्याचे शेती विभागाने दिलेली ऊस बिलाची पावती घेवून ऊस बिलाची रक्कम बँकेतून घ्यावी.असे आवाहन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले की,तीन लाख रू शिलकेवर आमचे संचालक मंडळ सत्तेवर आलेवपासून पहिलाच हंगाम संपन्न झाला,व्यवस्थापकीय खर्च, जाहिरात, डिझेल,भत्ता अशा आर्थिक बाबींचा या खर्चावर नियंत्रण ठेवून सभासद व कामगार केंद्रबिंदू मानून काम केले. सभासद व कर्मचाऱ्यानी संचालक मंडळावर विश्वास ठेवून ऊस पुरवठा केल्याने कारखाना दिडपट क्षमतेने चालविला.

हंगामात 3 लाख 82 हजार 381 मे.टन ऊस गाळप करुन 3 लाख 96 हजार 800 क्विंटल पोती साखरेचे उत्पादन केले.सरासरी साखर उतारा 10.38 मिळाला. सभासदांच्या विश्वासास पात्र राहून ऊस बिले, तोडणी ठेकेदारांची बिले, कामगार पगार वेळेवर देण्याचा प्रयत्न केला.पदभार घेतल्यानंतर जाहीर केल्या प्रमाणे गळीतास आलेल्या अखेरच्या पंधरवाडयाचे शेवटच्या टनापर्यंतचे ऊस बिल वेळेपूर्वी संबंधीत बँकेत जमा केले.

या प्रसंगी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, प्रकाश पाटील, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे,

सुरेश कोळेकर यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,कामगार उपस्थित होते. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात व संचालक मंडळांनी शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके व रामचंद्र वाकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

जिल्हयातील इतर कारखान्यांचे तुलनेने या संचालक मंडळाने चालू हंगामातील ऊसाचे बिल सभासद शेतकऱ्यांना लवकर दिल्याने मार्चअखेरचे व्यवहार करणे सोयीचे होणार आहे.

तानाजी खरात,उपाध्यक्ष दामाजी शुगर

कार्यक्षेत्रातील व गेटकेन ऊसाचे बील धनश्री महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मंगळवेढा व त्यांचे विविध शाखा, जिजामाता महिला नागरी बि।शेती सह।पतसंस्था मंगळवेढा, रतनचंद शहा सह।बँक मंगळवेढा, बँक ऑफ इंडिया शाखा मंगळवेढा, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि।शाखा मंगळवेढा इत्यादी बँका/पतसंस्था मध्ये संबंधीत शेतक-यांचे मागणीनुसार खात्यावर वर्ग केले.

सुनिल दळवी, कार्यकारी संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharshtra Politics: ...तर १००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील, मुख्यमंत्रीपदावरून BJPच्या बड्या नेत्याचं खळबळजनक ट्विट

WTC Points Table: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाकडून हिसकावला 'नंबर वन'चा मुकूट; पर्थमधील विजयानंतर कसे आहे फायनलचे समीकरण?

Maharashtra Cabinet: नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी लॉबिंगला सुरुवात; कोणते आमदार गेलेत नेत्यांच्या भेटीला? जाणून घ्या

Madhuri Misal : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार माधुरी मिसाळ यांचे मेट्रोमार्ग, रुग्‍णालयाच्‍या कामांना प्राधान्‍य

Share Market Closing: शेअर बाजार मोठ्या वाढीसह बंद; सेन्सेक्स 1000 अंकांच्यावर, निफ्टीने पार केला 24,200चा टप्पा

SCROLL FOR NEXT