Adhar card sakal
सोलापूर

Solapur : ‘चिमणी’ शांत; आता पुढे काय? सोलापूरकर, शेतकरी अन्‌ सभासदांच्या मनात प्रश्‍नच प्रश्‍न

नोटिशीनुसार कारखान्यावर कारवाई करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गेल्या आठ वर्षांपासून न्यायालयीन लढाईच्या फेऱ्यात अडकलेली श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या को-जनरेशनची चिमणी अखेर आज (गुरुवारी) शांत झाली. चिमणी पाडण्यापूर्वी पूजा केली गेली, मुहूर्त पाहिला अन्‌ ३ वाजून १० मिनिटांनी पाडकामासाठी ब्रेकर लावला गेला.

३ वाजून ५२ मिनिटाला चिमणी जमीनदोस्त झाली. चिमणी शांत झाली असली तरी कामगार व शेतकऱ्यांचा मनातील धग कायम आहे. दुसरीकडे चिमणी पडली, आता पुढे काय? होटगी रोडवरून विमान कधी उडणार? इतर अडथळ्याचे काय होणार? कारखाना पुढचा गाळप हंगाम घेणार का? शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न कसा मिटणार? असे एक ना अनेक प्रश्न सोलापूरकर नागरिक, शेतकरी अन्‌ सभासदांच्या मनात आहेत. मात्र, याचे ठोस उत्तर आजतरी कोणाकडेही नाही.

आदेश स्वीकारला, अभिनंदन नाकारले

श्री सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडकामानंतर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कारवाईबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी नियमबाह्य होती, कोणतीही परवानगी नसल्याने ४७८ कलमांतर्गत कारखान्याला ४५ दिवसांची नोटीस बजाविली होती.

नोटिशीनुसार कारखान्यावर कारवाई करण्यात आली. नियमांचे व आदेशाचे पालन केले. यावर एका पत्रकाराने धाडसी कारवाईबाबत अभिनंदन केले. मात्र आयुक्तांनी अभिनंदन नाकारले. तसेच कारवाई ठिकाणी उपस्थित असलेल्या सहायक पोलिस उपायुक्त यांचेदेखील काहींनी धाडसी कार्याबाबत अभिनंदन केले. मात्र, हे काम शौर्याचे नाही, असे म्हणत अभिनंदन नाकारले.

पोलिसांवरील ताण हलका

सोलापूर ः मागील तीन दिवसांपासून श्री सिद्धेश्वर कारखाना परिसरात चिमणी पाडकामासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी आज चिमणी पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला. कारखाना परिसरात मागील ४८ तासापासून तीनशेपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या पथकांना कोणत्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी आदेश दिलेले होते. आज दुपारी चिमणी पाडल्यानंतर काही प्रमाणात पोलिसांचा ताण हलका झाला आहे.

झालेल्या खर्चाचा हिशेब बाकी

महापालिकेने चिमणीचे पाडकाम करण्यासाठी १ कोटी १७ लाख रुपयांचा मक्ता निश्चित केला आहे. त्याचबरोबर कारखानास्थळावर दाखल होण्यापासून ते चहा, पाणी, जेवण यांची व्यवस्था. इतर वाहतुकीचा खर्च. आदी बाबींचा हिशोब महापालिकेने अद्याप केले नाही. तर पोलिस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांवरील आणि बाहेरून आणलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा खर्चाचा हिशोब अद्याप व्हायचा आहे. प्रशासनाने केलेला हा सर्व खर्च कारखान्याकडून वसूल करण्यात येणार आहे.

चिमणी पाडकामाचा आतापर्यंतचा प्रवास

२४ फेब्रुवारी २०१४ लाख महापालिका प्रशासनाकडून ४७८ ची पहिली नोटीस

१२ एप्रिल २०१७ रोजी नगररचना विभागाकडे अधिनियम १९९६ कलम ५८ व ५९ आणि २५३ अन्वये चिमणीला बांधकाम परवानगी मिळावे यासाठी कारखान्याचा महापालिकेकडे प्रस्ताव सादर

२५ जुलै २०१७ रोजी कारखान्याने परवानगीसाठी केला दुसऱ्यांदा अर्ज. डीजीसीएची परवानगी नसल्याने नाकारला परवाना

  • नोव्हेंबर २०१७ मध्ये कारखान्याने घेतली न्यायालयात धाव

  • ऑगस्ट २०१८ मध्ये चिमणी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले

  • ७ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष चिमणीची पाहणी

  • ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आठ दिवसांत चिमणी पाडण्याची कारखान्याला नोटीस

  • १८ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिका प्रशासनाची तारीख निश्चित, परंतु कारवाईला स्थगिती

  • २०२१ मध्ये महापालिका प्रशासनाने काढली तिसऱ्यांदा नोटीस

  • २०२२ मध्ये चिमणी प्रकरण पुन्हा न्यायप्रविष्ट. डीजीसीएचा अहवाल सादर करण्याबरोबर महापालिकेची नोटीस केली रद्द

  • नोव्हेंबर २०२२ मध्ये महापालिकेकडील चिमणीची सुनावणी पूर्ण

  • २७ मे २०२३ रोजी कारखान्याला अनधिकृत चिमणी प्रकरणी ४५ दिवसांची नोटीस बजाविली

  • १५ जून २०२३ रोजी चिमणी जमिनीदोस्त

कारवाईचा दुसरा दिवस...

  • पहाटे ४ : वाहनांतून पोलिस कर्मचारी बंदोबस्तस्थळी दाखल

  • पहाटे ५ : महापालिकेचे ठराविक अधिकारी व कर्मचारी चिमणीस्थळी दाखल

  • पहाटे ६.३० ः चिमणी पाडण्याच्या दिशासह इतर यंत्रणेची तयारीला सुरू

  • सकाळी ११ : दुपारी ३ पर्यंत चिमणी पाडण्याची तयारी पूर्ण

  • दुपारी १२ पासून ः आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक असलेली कुमक मागविण्यात येऊ लागली

  • दुपारी १ ः पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांची वाहनांची वर्दळ वाढली

  • दुपारी २ ः रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची यंत्रणा चिमणीस्थळी दाखल

  • दुपारी २.३० ः चिमणी पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज, पोलिस आयुक्त चिमणीस्थळावर दाखल

  • दुपारी २.४० ः चिमणी स्थळावरील बंदोबस्त हटविण्यात आला. महापालिका व पोलिस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले

  • दुपारी २.४५ ः महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले चिमणीस्थळावर दाखल

  • दुपारी ३ ः चिमणी पाडण्यापूर्वी केली पूजा

  • दुपारी ३.१० ः चिमणीच्या पाडण्यासाठी चेन्नईवरून आणलेल्या क्रेनद्वारे आणि ब्रेकर मशिनद्वारे पाडकामाला सुरवात

  • दुपारी ३. ५२ ः चिमणी आडवी झाली. त्यानंतर सात सेकंदात जमिनीवर कोसळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

Beed Assembly Election 2024: बीड विधानसभेच्या बंडखोर अपक्षांनी पळविले तोंडचे पाणी!

Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT