ST Bus  Sakal
सोलापूर

सोलापूर : दिव्यांग, ग्रामीण भागातील ST प्रवाशांची होतेय धावपळ

‘सर्व्हर डाऊन’मुळे ‘स्मार्टकार्ड’ला उशीर

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग यांच्यासह एकूण २९ विविध घटकांना प्रवास भाड्यात ३३ ते शंभर टक्के सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक आहे. यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागत असल्याने तसेच नोंदणी पोर्टलचे सर्व्हर मागील आठ दिवसांपासून डाऊन असल्याने स्मार्ट कार्ड मिळण्यास उशीर होत आहे.

एसटीने स्मार्टकार्ड काढण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली. आता ३१ जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. १ जुलैपासून एसटीने प्रवास करणाऱ्या लाभार्थ्यांना स्मार्टकार्ड बाळगणे आवश्यक आहे. मात्र स्मार्टकार्ड काढण्यास सर्व्हर डाऊनचा अडथळा निर्माण होत असल्याने स्मार्टकार्ड हे ३१ जूनपर्यंत पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. १ जुलैपासून स्मार्टकार्ड नसणाऱ्या लाभार्थ्यांना पूर्ण प्रवास भाडे देऊन प्रवास करावा लागणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांनी स्मार्टकार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्मार्टकार्ड मिळण्यास उशीर झाला. एसटी कर्मचाऱ्यांनी स्मार्टकार्ड नोंदणीला वेग दिला असला तरी आता त्याला सर्व्हर डाऊनचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून, त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. स्मार्टकार्ड नोंदणीसाठी यापूर्वी एसटी आगाराबरोबरच खासगी एजंट व सेतू केंद्रांना परवानगी देण्यात आली होती. नंतर ही सोय एसटी आगारात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT