Strawberry sakal
सोलापूर

Solapur : लालचुटूक स्ट्रॉबेरीचे मोठे पोषणमूल्य

अँटिऑक्सिडंटसह पोटॅशियम व मँगनीजची मोठी उपलब्धता

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : फळांच्या बाजारात हिवाळ्यात दाखल होणारे आकर्षक लालचुटूक स्ट्रॉबेरी हे फळ रुजू लागले आहे. त्यासोबत स्थानिक उत्पादनात देखील मोठी संधी समोर आली आहे.

स्ट्रॉबेरीतील घटक

पाणी : ९१ टक्के

कार्बोहायड्रेट : ८ टक्के

प्रोटीन (प्रथिने) : १ टक्का

ऊर्जा : ३३ किलो कॅलरी (प्रति १०० ग्रॅम)

व्हिटॅमिन सी : ७१ टक्के (दैनिक गरजेच्या तुलनेत)

मॅंगनीज : १८ टक्के

फ्री रॅडिकलपासून संरक्षण

आहारतज्ज्ञ ऋषीकेश जाकोरे यांनी सांगितले, की सर्वसाधारणपणे शरीरात चुकीचा आहार व विहारामुळे फ्री रॅडिकलची निर्मिती अधिक प्रमाणात होते. हे फ्री रॅडिकल आरोग्यासाठी हानिकारक असतात. या स्थितीत या फ्री रॅडिकलचा वाईट परिणाम कमी करण्यासाठी अँटिऑक्सिडंटची गरज असते. त्यामुळे फळातील अँटिऑक्सिडंट शरीराला फ्री रॅडिकलपासून संरक्षित करण्यासाठी उपयोगी ठरतात.

बाजारात चांगली मागणी

येथील फळविक्रेता प्रशांत कांबळे सांगतात, की हिवाळा आला की महाबळेश्वर, सातारा, पाचगणी आदी भागातून स्ट्रॉबेरी फळाची आवक सुरू होते. लहान मुलांना या फळांचा रंग आवडत असल्याने त्याला चांगली मागणी असते. साधारणपणे ४० ते ५० रुपये बॉक्स याप्रमाणे स्ट्रॉबेरी विकली जातात. सोलापुरात इतर फळांप्रमाणेच स्ट्रॉबेरीलाही चांगली मागणी असते.

स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

स्ट्रॉबेरी तुमच्या संपूर्ण शरीरासाठी चांगली असते. ते नैसर्गिकरीत्या जीवनसत्त्वे, फायबर आणि विशेषतः पॉलिफेनॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सचे उच्चस्तर प्रदान करतात, तेही कोणत्याही सोडियम, चरबी किंवा कोलेस्ट्रॉलशिवाय. यामध्ये अँटिऑक्सिडंट सोबत पोटॅशियम व मँगनीजचा साठादेखील अधिक असतो.

स्ट्रॉबेरी हे संकरित फळ

एग्प्लान्ट्स, टोमॅटो आणि एवोकॅडो हे वनस्पतीदृष्ट्या बेरी म्हणून वर्गीकृत आहेत. पण लोकप्रिय स्ट्रॉबेरी अजिबात बेरी नाही. वनस्पतिशास्त्रज्ञ स्ट्रॉबेरीला स्यूडोकार्प म्हणतात. स्ट्रॉबेरी हे एक बहुविध फळ आहे, ज्यामध्ये मांसल भांड्यात एम्बेड केलेली अनेक लहान फळे असतात. आधुनिक स्ट्रॉबेरी ही लहान वन्य स्ट्रॉबेरीची मानवनिर्मित संकरित आहे; ज्याचे शेल्फ लाइफ कमी आहे तसेच चव आणि सुगंध चांगला आहे. आधुनिक स्ट्रॉबेरी प्रथम १८व्या शतकात फ्रान्समध्ये दिसली. त्याचे संकरीकरण फार पूर्वीपासून सुरू झाले.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला ‘जीआय’ मानांकन

दरम्यान, महाबळेश्वरच्या परिसरात लाल मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीला जीआय मानांकन मिळाल्याने मध्यंतरी पोस्ट खात्याने विशेष टपाल तिकीट काढून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. एकूण आता स्ट्रॉबेरी उत्पादन पुढील काळात महाराष्ट्रात वाढण्यास सुरवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT