युवा संशोधक सूरज बागल यांनी ‘मराठी टेक डॉट इन’, हे संकेतस्थळ तयार करुन मराठी माणसाला मराठीतच तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी केलेला भाषिक डोमेनचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
सोलापूर - इयत्ता आठवीत असताना स्वतःचा ब्लॉग तयार करणाऱ्या युवा संशोधक सूरज बागल यांनी ‘मराठी टेक डॉट इन’, हे संकेतस्थळ तयार करुन मराठी माणसाला मराठीतच तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी केलेला भाषिक डोमेनचा प्रयोग यशस्वी झाला आहे. सूरज बागल यांच्या या स्टार्टअपची दखल सातासमुद्रापार घेतली गेली आहे. त्यांच्या ‘मराठी टेक’ पोर्टलची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली आहे. बागल यांनी भाषिक डोमेनमध्ये मिळविलेले यश हे जणू गगनाला भरारी घेतल्याप्रमाणे असल्याचे मानले जात आहे.
जुळे सोलापुरातील सूरज बागल यांना लहानपणापासूनच इंटरनेटची आवड निर्माण झालेली होती. भारती विद्यापीठाच्या शाळेत शिक्षण घेताना त्यांनी इंटरनेट माध्यमाचा वापर प्रभावीपणे कसा करता येईल, याचा विचार सुरु केला. आठवीत शिकत असताना त्यांनी स्वतःचा मराठी ब्लॉग सुरु केला. त्यावर त्यांनी गुगल क्रोमचा वापर कसा करावा? या विषयावर पहिला लेख टाकला होता. हा ब्लॉग मराठी ब्लॉगर्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला.तिथेच त्यांच्या संशोधक वृत्तीला विजयाची पहिली सलामी मिळाली.
तद्नंतर सूरज बागल यांनी ‘बीसीए’ पर्यंतचे शिक्षण मंगळवेढेकर कॉलेजमध्ये पूर्ण केले. तेव्हा त्यांनी ‘वेब डिझाईन’च्या कामास सुरवात केली होती. स्वतःची वेबसाइट असावी ती देखील मराठी लोकांना समजण्यासारखी असावी. त्यातील ‘टेक इन्फो’ किंवा मजकूर हा मराठीत लोकांना तंत्रज्ञानातील बदलांची माहिती देणारा असावा, या भूमिकेवर ते ठाम होते. पण वेबसाइटचे डोमेन देखील मराठीत असण्याबद्दल त्यांना थिंक ट्रान्सचे अक्षत जोशी व परिमल खाडे यांनी मदतीचा हात दिला. बदलत्या कालात भाषिक डोमेन हे महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे त्यांचेही डोमेन मराठीत व्हावे यासाठी त्यांनी मदत केली.
त्यामुळे इंग्रजीत नाव असलेल्या या डोमेनचे मराठी रुप त्यांनी थिंक ट्रान्स फाउंडेशनच्या मदतीने साकारले. त्यामुळे मराठी टेक डॉट भारत या नावाने डोमेन उपयोगात आले. नुकतेच दिल्ली येथे झालेल्या १४० देशाच्या परिषदेत सूरज बागल यांच्या या भाषिक डोमेनची दखल घेतली गेली. त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. या डोमेनच्या नावाने यूट्यब चॅनल व सोशल मीडियावर देखील मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.
ठळक नोंदी...
मराठी टेकने गूगल ट्रान्सलेटमध्ये ५००० हून अधिक शब्द भाषांतरित करून Translatathon स्पर्धेत देशात प्रथम पाचमध्ये स्थान मिळविले
मराठी टेकच्या फेसबुक पेजला १६००० पेक्षा अधिक लाईक्स, यूट्यूब चॅनलला ११ हजारपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स, ट्विटरवर १०००० पेक्षा अधिक फॉलोअर्सचा प्रतिसाद
कॉम्प्युटर व स्मार्टफोन्सवर मराठी टायपिंग करण्याचे व्हिडिओ पाहून १३ लाखांहून अधिक लोकांनी त्यांच्या कॉम्प्युटर व फोन्सवर मराठीत कंपोज करण्यास सुरवात केली आहे.
मराठी टेकचा कंटेंट आता वेबसाइट, सोशल मीडिया, अँड्रॉइड ॲप, यूट्यूब चॅनल, डेलीहंट, गूगल न्यूज अशा माध्यमांवर उपलब्ध
मराठी टेकच्या यूट्यूब चॅनलला १६ लाख व्ह्युवर्स
आता यापुढे ज्या प्रकारे मराठी टेक फक्त तंत्रज्ञान विषयाला वाहून घेतलेले पोर्टल आहे त्याप्रमाणेच इतर विषयांची माहिती मराठीत उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाइट्सची निर्मिती करण्याचा मानस आहे.
- सूरज बागल, सहस्त्रार्जुन नगर, जुळे सोलापूर
सूरज बागल यांनी केलेल्या वेबसाईटवर भाषिक डोमेन स्वरुपात साकारले जावे, यासाठी आम्ही मदत केली. त्यांच्या या भाषिक डोमेन निर्मितीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.
- अक्षत जोशी, थिंक ट्रान्स फाउंडेशन, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.