Tak esakal
सोलापूर

Solapur : रोजच घ्या ताक नावाचे अमृत

पूर्वी जेवणाच्या शेवटी ताकभात खात असत. कारण ताक सर्व जेवणाची पचनक्रिया पूर्ण करून शरीराला नैसर्गिक थंडावा देते. ताक हे शरीराला परिपूर्ण लाभ देते. तसेच ते शरीराला हायड्रेट करून संतुलीत स्थितीत ठेवते.

सकाळ वृत्तसेवा

प्रकाश सनपूरकर : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - धावपळीची जीवनशैली, खाण्यातील विस्कळितपणा या सारख्या अनेक समस्यांवर ताकाचा आहारातील वापर पचनक्रिया सुलभ करणे, हायड्रेशन, क्षाराचे संतुलन या सारख्या अनेक उपायांचा स्रोत म्हणून काम करते. त्यामुळे त्याला आयुर्वेदाने पृथ्वीवरील अमृत म्हटले आहे.

पूर्वी जेवणाच्या शेवटी ताकभात खात असत. कारण ताक सर्व जेवणाची पचनक्रिया पूर्ण करून शरीराला नैसर्गिक थंडावा देते. ताक हे शरीराला परिपूर्ण लाभ देते. तसेच ते शरीराला हायड्रेट करून संतुलीत स्थितीत ठेवते.

एवढेच नव्हे, तर सध्या पंचकर्म ही शरीरशुध्दीची महत्त्वाची प्रक्रिया जी की आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने संपूर्ण प्रक्रिया तीन दिवस ताक पिऊन राहिल्यास पूर्ण होते. त्यामुळे ताक हे मानवी शरिरासाठी ‘अमृत’च मानले जाते.

लोणी विरहित ताकातील घटक

ऊर्जा- ४० किलो कॅलरीज

कर्बोदके- ४.८ ग्रॅम

स्निग्ध पदार्थ- ०.९ ग्रॅम

प्रथिने- ३.३ ग्रॅम

कॅल्शिअम- ३० मिलीग्रॅम

फॉस्फरस- ३० मिलीग्रॅम

लोह- ०.८ मिलीग्रॅम

ताकाचे औषधी उपयोग

- लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते

- थोडे मीठ टाकलेले ताक लघवीचा त्रास कमी करते

- तोंड आल्यास ताकाच्या गुळण्या कराव्यात

- जायफळ पूड टाकलेले ताक डोकेदुखी कमी करते

- साखर व काळे मिरे टाकलेले ताकाने पोटदुखी थांबते.

ताकाचे प्रकार -

दधिमण्ड - दह्यात पाणी घातल्याशिवाय जे ताक हलवले जाते त्या ताकाला ‘ दधिमण्ड ‘ म्हणतात. हे ताक ग्राही, मळ रोखणारे, दीपक, पाचक व शीतल असते. ते वायुनाशक पण कफवर्धक असते.

हिंग, जिरे व सैंधव घालून हे ताक घेतले असता ते वायुनाशक, अर्श व अतिसार दूर करणारे, रूची वाढविणारे, पुष्टि देणारे, बलवर्धक, नाभीपासून खालील पोटाचा शूळ बंद करणारे असते. गूळ घालून तयार केलेले दधिमण्ड हे मूत्रकृच्छवर उत्तम उपाय आहे व चित्रक घातलेले दधिमण्ड पांडुरोगावर श्रेष्ठ उपाय आहे. साखरयुक्त दधिमण्ड ताकाचे गुण आंब्याच्या रसाइतकेच श्रेष्ठ आहेत.

मठ्ठा- दह्यावरचा चिकट भाग काढून ते हलवले असता त्याला ‘ मथित ‘ (मट्ठा) असे म्हणतात. मठ्ठा वायू व पित्तहारक, प्रसन्नता देणारा व कफ व पित्तनाशक असतो. याव्यतिरिक्त उष्णतेपासून होणारे जुलाब, अर्श व संग्रहणीवर ते हितकारक असते.

तक्र- दह्यात त्याच्या चौथ्या भागाइतके पाणी घालून बनवले जाणाऱ्या ताकाला ‘ तक्र ‘ म्हणतात. तक्र मलास रोखणारे, तुरट, आंबट, पाकाने व रसाने मधुर, हलके, उष्णवीर्य, अग्निदीपक, शक्तिवर्धक, तृप्तिदायक व वायुनाशक आहे. ते हलके व मलास रोखणारे असल्याने ग्रहणी असणाऱ्या रुग्णांना पथ्यकारक आहे. तसेच ते पाकाने मधुर करणारे असल्याने पित्तप्रकोप करत नाही व तुरट उष्णवीर्य व रुक्ष असल्याने कफ दूर आहे.

उद्भिवत- दह्यामध्ये अर्धा भाग पाणी घालून जे ताक तयार करण्यात येते त्याला ‘ उदश्वित ‘ असे म्हणतात. उदश्वित कफकारक, बलवर्धक व आमनाशक असते.

छच्छिका (ताक किंवा छाज)- दह्यामध्ये अधिक पाणी घालून, हलवून, त्यातून लोणी काढून, पुन्हा पाणी घालून जे बरेच पातळ केले जाते त्याला ‘ ताक ‘ म्हणतात. थोडक्यात ज्या ताकातील सर्व लोणी संपूर्णपणे काढून घेतले जाते ते ताक आरोग्यदायक व हलके असते. ज्या ताकातील लोण्याचा थोडासा भाग काढून घेतलेला असतो, असे ताक जड, वृष्य व कफकारक असते.

ताकाच्या अर्थकारणाला चालना देण्याची गरज -

साधारणपणे स्थानिक बाजारात ताकाची विक्री ३० रुपये लिटर दराने होते. ब्रॅंडेड ताकही बाजारात विक्रीस आले आहे. पण अजूनही ताकामध्ये चवीनुसार काही मिरे, सैधंव मीठ, आले टाकून ताकाचे प्रकार तयार विक्री करण्याची संधी वाढते आहे. ताकाच्या विक्रीत स्थानिक विक्रेत्यांचा वाटा खूप मोठा आहे. तसेच विवाह समारंभ, स्नेहभोजन, महाप्रसाद वितरणात मठ्ठा असल्यास मिष्टान्नाचे भोजन पचण्यास सुलभ होते.

बाजारात सध्या ताकाची विक्री उन्हाळ्यात चांगली होते. इतर कालावधीत देखील ताजे ताक नियमित विक्री कमी प्रमाणात होते. पण शरीर संतुलनासाटी ताकाचा उपयोग सर्वाधिक आहे याची जाणीव वाढेल त्या प्रमाणे दह्यासोबत ताकाची विक्री वाढण्यास मदत होईल.

- नितीन भोसले, डेअरी उद्योजक, सैफुल, सोलापूर

आयुर्वेदामध्ये ताकाचे वर्णन अग्र द्रव्य आणि पथ्यकर द्रव्य यामध्ये आलेले आहे. अंग गौरवता, मंद अग्नी, अरोचकता, अतिसार, मुळव्याध यामध्ये ताकाचा औषधी उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती क्षीण होते तेव्हा पचनाला बल देण्यासाठी आणि शरीरातील द्रवांश टिकवून ठेवण्यासाठी ताक हे उत्कृष्ट आहे.

ते बल वाढवणारे, प्रमेह कमी करणारे व कृमींचा नाश करणारे आहे. फ्रीजमध्ये थंड केलेले, अती आंबट ताक किंवा आदल्या दिवशीचे ताक सेवन करू नये. ताज्या ताकामध्ये ओव्याची पूड, जिऱ्याचे पूड यांचे मिश्रण करून पिल्यास अधिक पाचक ठऱते. उन्हाळाच नव्हे तर वर्षभर रोज जेवणानंतर ताकाचे सेवन करणे आरोग्यदायी आहे.

- वैद्य कीर्ती बोंगरगे, संकल्प क्लिनीक, जोडभावी पेठ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT