beed accident beed accident
सोलापूर

सोलापूर : कारंडेवाडी फाट्याजवळ भीषण अपघात; दोन बालिकांसह तीन ठार

इतर नऊ जण जखमी

Amit Ujagare (अमित उजागरे)

सांगोला : ट्रकने कारला (Truck-Car accident) समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह दोन लहान मुलींचा मृत्यू (three died) झाला आहे. तसेच इतर नऊजण जखमीही झाले आहेत. ही घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कारंडेवाडी फाट्याजवळ घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघातात चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे (रा. उदनवाडी, ता. सांगोला) व प्रवासी कावेरी मनोज हरीजन (वय 7, रा. निरलगी, ता. ताळेकोटी, जि. विजापूर), गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8, रा. कोंडगोडी, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा) हे तीनजण गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, १ ऑगस्ट रोजी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हा ओम्नी कारमधून उदनवाडी (झापाचीवाडी, ता. सांगोला) येथून तीन पुरुष, तीन महिला, सहा लहान मुलांना घेऊन सिंदगी (कर्नाटक) येथे जात होता. करांडेवाडी फाट्याजवळ उजव्या बाजूला असणाऱ्या सर्व्हिस रोडने जात असताना समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकची कारला समोरुन जारदार धडक बसली.

ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात ओम्नी चालक शिंगाडे व प्रवासी कावेरी हरीजन, गुड्डी चंद्रकांत मगीरी हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. कारमधील इतर स्त्री, पुरुष व लहान मुले असे एकूण नऊजण जखमी झाले आहेत. तसेच कारचे मोठे नुकसान झाले आहे. मालट्रक चालकाविरुद्ध माणिक शिंगाडे (रा. उदनवाडी, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT