Vairag esakal
सोलापूर

Solapur Barshi News : बार्शी तालुक्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे; मात्र नदी, नाले कोरडेच

वैराग भागातील स्थिती; प्रकल्पांमध्येही अत्यंत कमी पाणीसाठा

सकाळ डिजिटल टीम

वैराग : वैराग भागात मृग आणि रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसाच्या भरवशावर जवळपास ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र अद्यापही नदी, नाले कोरडेच असून धरणात देखील अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे पुढील नक्षत्रात दमदार पाऊस पडतो की नाही? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

बार्शी तालुक्यातील हिंगणी, जवळगाव व ढाळे पिंपळगाव हे तीन मध्यम प्रकल्प वैराग भागातच आहे. या प्रकल्पांना येऊन मिळणाऱ्या महत्त्वाच्या व मोठ्या असणाऱ्या भोगावती, नागझरी व नीलकंठा या नद्या मात्र अद्याप कोरड्या ठणठणीत आहेत. तसेच धरणात देखील पाणीसाठा अतिशय कमी आहे.

हिंगणी मध्यम प्रकल्प

हिंगणी मध्यम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ४५.५१ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३१.९७ द.ल.घ.मी. एवढा आहे. २२ जुलै रोजी धरणात ३.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे १५ ऑगस्टलाच हिंगणी धरण १०० टक्के भरले होते.

हिंगणी मध्यम प्रकल्पावर वैराग, गौडगाव, उपळे (दु), घाणेगाव, जामगाव, मळेगाव आदी गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांचा वरदायिनी म्हणून ओळख असलेला हिंगणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यावर हिंगणी, पिंपरी, साकत, मळेगाव, लाडोळे, घाणेगाव, उपळे, जामगाव, नांदनी, लाडोळे, हळदुगे, मानेगाव, काळेगाव, तडवळे, इर्ले, इर्लेवाडी येथील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो आहे.

जवळगाव प्रकल्प

जवळगाव धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३४.९२ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा २९.१९ दशलक्ष घनफूट इतका आहे. तरी सध्या धरणात २१.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये धरण पूर्णपणे भरले होते.

या धरणामुळे ज्योतीबाचीवाडी, अंबाबाईची वाडी, सारोळे, भांडेगाव, कासारी, भालगाव, मिर्झनपूर, गौडगाव, रुई, आंबेगाव, काटी, हत्तीज, हिंगणी, धामणगाव, राळेरास, कौठाळी या गावांना अधिक फायदा होतो आहे.

ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प

ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता १२.६६ द.ल.घ.मी असून उपयुत्त पाणीसाठा ९.८६ द.ल.घ.मी एवढा आहे. उणे २०.८९ द.ल.घ.मी उपयुक्त पाणीसाठा सद्यस्थितीला धरणात आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हर फ्लो झाले होते.

ढाळे पिंपळगाव धरण क्षेत्र परिसरातील ढाळे पिंपळगाव, मळेगाव, साकत, महागाव, बावी, तांदूळवाडी, चिखर्डे, काळेगाव, घाणेगाव या गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होतो. मात्र या यावर्षी म्हणावा तसा दमदार पाऊस अद्याप पडला नसल्याने धरणात पाणी कमी आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दरमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT