A police outpost deployed on the flanks of the Maratha reservation. esakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : ईव्हीएमच्या स्ट्राँग रूमबाहेर पोलिसांचा पहारा

Solapur Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त त्या गोदामासमोर किंवा ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असणार आहे. यंत्रांसाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र सोय; शनिवारी सकाळी आठपासून मतमोजणी हाेणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वच मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे (ईव्हीएम) आता त्या- त्या तालुक्यांतील गोदामांमध्ये ठेवण्यात आली आहेत. निवडणूक अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त त्या गोदामासमोर किंवा ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असणार आहे. बुधवारपासून २३ नोव्हेंबरला निकाल लागेपर्यंत हा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील तीन हजार ७३८ केंद्रांवर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतमोजणी होईपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ईव्हीएम सीलबंद करून गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या व परवानगी दिलेल्या वाहनांमधून ईव्हीएम त्या गोदामांत जमा करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांकडील ईव्हीएम जमा करण्यासाठी त्या गोदामाच्या ठिकाणी १४ टेबल लावले होते.

मंगळवारी (ता. १९) सकाळी ११ नंतर इलेक्शन ड्यूटीवर गेलेले कर्मचारी मतदानानंतर ईव्हीएम जमा करून घरी जाण्याच्या धावपळीत पाहायला मिळाले. जिल्ह्यात एकूण ६६ ते ६७ टक्क्यांपर्यंत मतदान झाले असून, मतदारराजाचा कौल कोणाला, याचे उत्तर आता २३ नोव्हेंबरला मिळणार आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

स्ट्राँग रूमबाहेर उमेदवार प्रतिनिधींना करावा लागेल ६० तास मुक्काम

मतदान पार पडल्यानंतर प्रत्येक केंद्रावरील ईव्हीएम त्या- त्या गोदामात किंवा शाळेत (मतमोजणीचे ठिकाण) ठेवण्यात आल्या आहेत. त्या स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना थांबता येणार आहे. त्यांच्यासाठी तेथे सोय करण्यात आली आहे. सध्या कडाक्याची थंडी असताना देखील त्या उमेदवार प्रतिनिधींना तब्बल ६० तास (मतमोजणी सुरू होईपर्यंत) त्या ठिकाणी थांबावे लागणार आहे. त्या प्रतिनिधींना अंथरूण, पांघरूण व जेवण स्वत:च आणावे लागणार आहे.

स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील तीन हजार ७३८ केंद्रांवरील ईव्हीएम त्या- त्या तालुक्यांतील गोदामांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता. २३) सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. त्यावेळी १४ टेबल म्हणजेच एकाचवेळी १४ फेऱ्या सुरू राहतील. त्या दिवशी दुपारी साडेचारपर्यंत निकाल हाती येतील. तत्पूर्वी, या सर्व स्ट्राँग रूमबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, त्यावर प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ukraine-Russia War: रशियानं युक्रेनवर डागलं लांब पल्ल्याचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र; युद्धाचा नवा अंक सुरु

Pune: पुण्यात खळबळ, मुलांमध्ये शाब्दिक वाद; नववीच्या पोराने शाळेत थेट गळाच चिरला!

Aam Adami Party : महाराष्ट्राची निवडणूक संपताच आपने जाहीर केली दिल्ली निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी

Hardik Pandya : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पांड्यावर IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यावर बंदी; पण का?

Latest Maharashtra News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियन संरक्षण उद्योग आणि क्षमता वितरण मंत्री यांची भेट

SCROLL FOR NEXT