Solapur Assembly Election  sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : जिल्ह्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान शक्य; जिल्हा प्रशासनाला विश्‍वास

Solapur VidhanSabha Election 2024 : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील करमाळा, बार्शी, पंढरपूर व सांगोला या चार ठिकाणी पाच वर्षांत आता २०१९ च्या तुलनेत चार लाख १४ हजारांवर मतदार वाढल आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील करमाळा, बार्शी, पंढरपूर व सांगोला या चार ठिकाणी २०१४ व २०१९ या निवडणुकांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. २०१४ मध्ये माढ्यातही ७५.२८ टक्के मतदान झाले होते.

२०१४च्या तुलनेत २०१९ मध्ये सव्वादोन लाखांवर मतदार वाढूनही मतदान २.६३ टक्क्यांनी घटले होते. आता २०१९च्या तुलनेत चार लाख १४ हजारांवर मतदार वाढल्याने यंदा जिल्ह्याचे एकूण मतदान ७० टक्क्यांहून अधिक राहील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील ११ मतदारसंघांतून १८४ उमेदवार आमदारकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासाठी जिल्ह्यातील ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यातील नेमके कितीजण मतदान करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण, मतदानाची टक्केवारी वाढल्यास निश्चितपणे उमेदवाराला अधिक लाभ होतोच.

पण, २०१४ मध्ये एकूण मतदारांपैकी साडेदहा लाख मतदारांनी मतदानच केले नाही. २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारांपैकी १२ लाख १६ हजार ३२५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. आता बुधवारी (ता. २०) होणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढेल, त्यासाठी १८४ उमेदवारच प्रयत्न करतील, असे चित्र आहे.

शहरातील तिन्ही मतदारसंघांत कमीच मतदान

सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर या शहरी मतदारसंघांत २०१४ व २०१९ या विधानसभेच्या दोन्ही पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५९ टक्क्यांपेक्षा कमीच राहिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत शहर उत्तरमध्ये ५६.५३ टक्के, दक्षिण सोलापुरात ५८.१४ टक्के आणि शहर मध्य मतदारसंघात ५८.९८ टक्के मतदान झाले होते.

२०१९च्या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढूनही दक्षिण सोलापुरात ५२.०१ टक्के, शहर उत्तरमध्ये ५२.४५ टक्के आणि शहर मध्यमध्ये ५५.४७ टक्के मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. आता या तिन्ही मतदारसंघांतील मतदार वाढले असून, मतदानाच्या टक्केवारीवर या तिन्ही मतदारसंघांतील समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी बुधवारी सर्वांचेच प्रयत्न दिसणार आहेत.

तीन निवडणुकांमधील मतदार (२०१४)

  • एकूण मतदार ३२,०१,६५४

  • झालेले मतदान २१,५२,०००

  • मतदानाची टक्केवारी ६७.२२ टक्के

(२०१९)

  • एकूण मतदार ३४,३४,५४९

  • झालेले मतदान २२,१८,२२४

  • मतदानाची टक्केवारी ६४.५९ टक्के

(२०२४)

  • एकूण मतदार ३८,४८,८६९

  • पुरुष मतदार १९,७१,८३१

  • महिला मतदार १८,७६,७२८

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wardha Vidhan Sabha Voting: वर्ध्यात निलेश कराळे मास्तरांना मारहाण; Video Viral

Assembly Election: मतदानासाठी केंद्रावर आले, मतपेटीवरील बटन दाबताच... गावात हळहळ, काय घडलं?

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT