डान्स अन्‌ ऑर्केस्ट्रा बारकडून नियमांचे उल्लंघन sakal
सोलापूर

सोलापूर : डान्स अन्‌ ऑर्केस्ट्रा बारकडून नियमांचे उल्लंघन

नियमांचे बारचालकांना बंधन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: शहर परिसरातील ऑर्केस्ट्रा व डान्सबार रात्री साडेबारापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. पण, प्रेवशद्वारावर आणि बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून आतमध्ये अश्लील नृत्य, अश्लील हावभाव, पैसे उधळणे, तेथील महिलांशी लगट करण्यावर पूर्णत: बंदी आहे. पोलिस रात्रीच्या वेळी लोकांच्या सुरक्षिततेसाठी दररोज शहर परिसरात गस्त घालतात, पण बारमध्ये नियमांचे पालन होते की नाही हे शक्यतो पाहतच नाहीत. त्यामुळे सरकारने घालून दिलेले नियम व निर्बंध पायदळी तुडविण्याचे प्रकार सुरू आहेत.

सोलापूरसह राज्यभरात जवळपास बाराशे डान्स बार असून, त्यामध्ये ६० ते ६५ हजार बारबाला काम करतात. दुसरीकडे, या व्यवसायावर पावणेदोन लाखांपर्यंत व्यक्ती अवलंबून आहेत. सोलापूर शहरात दोन डान्स बारपैकी विजयपूर रोडवरील नागेश बारचा परवाना रद्द झाला आहे. आता त्याच परिसरात दुसरा डान्सबार सुरू आहे. तर शहरात दहा ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याचे पोलिस आयुक्तालयातील परवाना शाखेने सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑर्केस्ट्रा व डान्स बारसाठी रात्री साडेबारापर्यंत वेळ आहे. तरीपण, काही ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ सुरू असतात, आतमध्ये शक्यतो नियमांचे उल्लंघनच केले जाते. तरीही, सामाजिक शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करून गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या पोलिस खात्यातील काही मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्तामुळे असे प्रकार सुरू आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सक्त सूचनेनंतरही ते बार नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्यामागील कारण अजूनपर्यंत समोर आलेले नाही. शहरातील हातगाडी चालकांवर कारवाई करणारे कायद्याचे रक्षक बड्या व्यावसायिकांकडे का दुर्लक्ष करतात, असा प्रश्न नागेश बारवरील कारवाईनंतर उपस्थित होऊ लागला आहे. आता फौजदार चावडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बार चालकाकडून नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर लक्ष दिले जात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सोलापूर- पुणे महामार्गावरील एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, बंद झालेले गॅंगवार पुन्हा सुरू होऊ नयेत, बार हे गुन्हेगारीची केंद्रे होऊ नयेत, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वेळेतच नियमांच्या साखळदंडात त्यांना बांधून ठेवणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिकांना आहे.

या नियमांचे बारचालकांना बंधन

  • ऑर्केस्ट्रा व डान्सबार रात्री साडेबारानंतर सुरू ठेवण्यावर बंदी

  • बारच्या प्रवेशद्वारावर व आतमध्ये सीसीटीव्ही लावणे बंधनकारक

  • बारमध्ये अश्लील नृत्य, अश्लील हावभाव नकोच, पैसे उधळण्यावरही निर्बंध

  • ऑर्केस्ट्रा गायक म्हणून चार महिला व चार पुरुषांनाच परवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT