solpur sakal
सोलापूर

Solapur : अवजड वाहतुकीमुळे आपघातात महिलेचा जागीच मृत्यू ; नागरिक संतप्त, प्रशासनाच्या निष्काळजीपणा विरोधात रास्ता रोको

शहरात येणारी अवजड वाहतूकीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे ती वाहतूक बंद

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - शहरात येणाय्रा अवजड वाहतुकीवर बंदी न घातल्याने सद्गुरु बैठकीसाठी जाणाऱ्या दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेला दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला असून दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी पंढरपूर रोडवर प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रास्ता रोको आंदोलन करत ठिय्या मांडला आहे.

शहरात येणारी अवजड वाहतूकीने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे ती वाहतूक बंद करावी व ती वाहतूक पंढरपूर बायपास मार्गे वळवण्यात द्यावी या मागणीसाठी नारायण गोवे व वारी परिवार हे सातत्याने प्रयत्न करीत होते. शांतता कमिटीच्या बैठकीत देखील या प्रश्न उपस्थित करण्यात आला होता नगरपालिकेच्या दालनात 21 सप्टेंबरच्या बैठकीत बाह्यवळण मार्गावर पंढरपूर रोड घाडगे कनेक्शन येथे व विजापूर रोड पुलाजवळ मंगळवेढा पोलीस स्टेशनकडून होमगार्ड ची नेमणूक तातडीने करणे.

सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत शहरातून जड वाहतुकीस मनाई असले बाबतचे मराठी,हिंदी,इंग्रजी अक्षरातील बोर्ड तयार करून शहरात प्रवेश होणारे पंढरपूर रोड घाडगे कलेक्शन येथे व विजापूर रोड पुलाजवळील बाह्यवळण मार्गावर मंगळवेढा नगरपरिषदेकडून बोर्ड लावणे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील नियमांचे पालन करून मंगळवेढा नगरपरिषदेकडून प्रकाश परावर्तित होणारे रबरी गतिरोधक बसविण्याचे ठरले बंद करणार असल्याचे लेखी पत्र देण्यात आले होते मात्र त्यामध्ये कोणतेही प्रकारचे अंमलबजावणी केली नाही.

अवजड वाहतूक बंद न झाल्यामुळे आज सकाळी सद्गुरु बैठकीसाठी चोखोमेळा नगर मधील रहिवासी कमल पांडुरंग साळुंखे वय 53 व त्यांचे पती हे दोघे सद्गुरु बैठकीसाठी जात असताना एम.एस.ई.बी जवळ पाठीमागून आलेला आयशर टेम्पो केए 63 7613 ने पाठीमागून धडक दिल्याने कमल साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला तर पती पांडुरंग साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत

दरम्यान शहरवासीयांनी प्रशासनाने चाल ढकल केल्यामुळे या महिलेच्या मृत्यूस प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रस्त्यावर ठिय्या मांडला त्यामुळे शहरात येणारी वाहतूक विस्कळीत होऊन लांबच लांब रांगा लागल्या आंदोलनामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, अजित प्रकाश गायकवाड विनायक कलुबर्मे, राहुल सावजी युवराज घुले अजय आदाटे,सुदर्शन यादव, प्रफुल्ल सौंमदळे,सुहास पवार, सतीश दत्तू,बापू मेटकरी, शरद हेंबाडे, विठ्ठल गायकवाड, दिलावर मुजावर,ज्ञानेश्वर कौडूभैरी,पांडुरंग नकाते, हर्षद डोरले आदी सह नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी आपण साडेचार मीटर उंचीची कमान स्वखर्चातून करून देण्याचे सांगितले माजी नगरसेवक अजित जगताप यांनी नगरपालिका पोलीस,नगरपरिषद प्रशासन,एस.टी. यांनी सातत्याने एकमेकांवर ढकलल्याने महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. रस्त्यावर रोडलाईट बंद आहे.

तर प्रा. विनायक कलुबर्मे यांनी वाडी परिवार यांना सप्टेंबर अखेरपर्यंत सूचनाफलक व कमान उभा करण्याचा लेखी पत्र देऊन देखील त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही त्यामुळे प्रशासनावर सदस्य मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. पंढरपूर रोडवर साडेचार मीटर उंचीच्या कमान उभारण्याची कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेतल्या नसण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT