2children_0.jpg sakal
सोलापूर

सोलापूर झेडपी शाळांची स्थिती! शिक्षकांची ४०० पदे रिक्त; २६४ शाळांचा पट २०पेक्षा कमी

तात्या लांडगे

सोलापूर : दहा टक्क्यांपेक्षा कमी पदे रिक्त असलेल्या जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची तात्काळ आंतरजिल्हा बदली झाली. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषद शाळांमधील ६६ शिक्षक त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात परतले. दुसरीकडे मात्र आपल्या जिल्ह्यात जवळपास १०० शिक्षक येणे अपेक्षित असतानाही केवळ २९ जणच आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांची चारशे पदे रिक्त असतानाही आपल्याकडील शिक्षकांना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले हे विशेष.

ग्रामविकास विभागाने यंदा प्रथमच शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या ऑनलाइन पध्दतीने केल्या. सुरवातीला आंतरजिल्हा बदल्या झाल्या. दिवाळीपूर्वी ही प्रक्रिया पार पडली. मानवी हस्तक्षेप नको या हेतूने यंदा ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. आता जिल्ह्याअंतर्गत शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु असून डिसेंबरपर्यंत एकाच ठिकाणी पाच वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांची दुसऱ्या शाळेवर बदली होणार आहे. वास्तविक पाहता शाळा सुरु होण्यापूर्वीच (१५ जूनपूर्वी) शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडते. मात्र, यंदा बदल्यांसाठी तब्बल पाच महिन्यांचा (ऑगस्ट ते डिसेंबर) कालावधी लागला आहे. अजूनही आंतरजिल्हा बदल्यांचा घोळ मिटला नसून बहुतेक शिक्षकांना सध्याच्या जिल्हा परिषदांनी सोडलेलेच (कार्यमुक्त) नाही. दरम्यान, आता शैक्षणिक वर्ष शेवटच्या टप्प्यात असताना शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदल्या झाल्यानंतर त्यांची आणि विद्यार्थ्यांची देखील मोठी अडचण होणार आहे.

समानीकरणाचा नियम पायदळी

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळा असून त्याअंतर्गत जवळपास अडीच लाख विद्यार्थी (पहिली ते पाचवी) शिक्षण घेत आहेत. ‘आरटीई’नुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक अपेक्षित असतो. मात्र, जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीचशे शाळांची पटसंख्या १० ते २० अशी आहे. त्या शाळांवर दोन-तीन शिक्षक कार्यरत आहेत. समानीकरणाचा नियम पायदळी तुडवला जात असल्याची स्थिती आहे. काही शाळांमध्ये ६०-७० विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक असून काही ठिकाणी बदली होऊनही नवीन शिक्षक मिळालेले नाहीत. काही शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक देखील नाहीत, हे विशेष.

शिक्षकांची ४०० पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत असून २६४ शाळांचा पट २०पेक्षा कमी झाला आहे. तरीपण, त्याठिकाणी दोन-तीन शिक्षक मंजूर आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये आठ हजार ८२६ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल चारशे शिक्षकांची पदे सध्या रिक्त आहेत. तरीसुध्दा, बाहेरील जिल्ह्यातून शिक्षक येण्याची वाट न पाहता आपल्याकडील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले, हे विशेष. दरम्यान, मागील पाच वर्षांत शासन स्तरावरून शिक्षक भरती न झाल्याने जिल्हा परिषद शाळांमधील रिक्तपदे वाढली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT