The sooner the diagnosis ... the sooner the release ..! 
सोलापूर

जितके लवकर निदान... तितकी लवकर मुक्ती..!

प्रशांत देशपांडे

सोलापूर : मला कोरोना होईल हे माहितच होते; परंतु इतक्‍य लवकर होईल याची खात्री नव्हती. निदान लवकर झाल्याने उपचारही लवकर सुरु करता आले अन्‌ मी बरी झाले. लोकानीही उगाच कोसेनाचा बाऊ करून घेऊ नये जितके लवकर निदान... तितके लवकर तुम्ही बरे व्हाल..! हेच सूत्र आहे कोरोनाला हरवण्याचे, असे सांगत होत्या कोरोना योध्दा महिला. 

ही योद्धा महिला ग्रामीण भागात औषधनिर्माण अधिकारी म्हणून काम करत आहे. कोरोनाशी दोन हात करताना, त्या कधी बाधित झाल्या हे त्यांनाही कळले नाही; पंरतु प्राथमिक स्वरूपात लक्षण दिसताच त्यांनी रविवार असूनही शासकीय रुग्णालय म्हणतेच कोव्हिड केअर सेंटर गाठले आणि सुरु झाली मग कोरोनाविरुद्धची लढाई. या लढाईत मला जिंकायचेय होते, म्हणून मी पूर्ण खबरदारी घेतली आणि बरी होऊन घरी परतल्याही..! 

त्या आवर्जून हे सांगत होत्या की, नागरीकांनी सिव्हिल म्हटले की घाबरून जावू नये. शासन त्या ठिकाणी सर्वात जास्त खबरदारी घेत आहे, आणि जगातील उत्तम उपचार पद्धती अवलंबत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लक्षणं दिसताच सिव्हिलमध्ये जावे. 

त्या म्हणाल्या, सोलापुरात जेव्हा कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते तेव्हा पासून मी काळजी घेत होते. मी औषध निर्मीती अधिकारी असल्याने मी खेडेगावात कर्तव्य बजावत होते. नागरिक मास्क न लावता तसेच कोणत्याही पध्दतीच्या सुरक्षेची काळजी न घेता नागरिक दवाखान्यात डॉक्‍टरांना दाखविण्यासाठी येत होते. मात्र आम्ही त्यांना वारांवार सांगत होतो. हे करत असतानाच माझी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे हा आपल्याला रोग होणार आहे याची माहिती होती. 

आम्ही सुध्दा मेडिसीन वाटप करताना कोरोना व्हायरस विषयी जनजागृती करत होतो. मात्र मला कोणाकडून ह्या व्हायरसची लागण झाली ते कळाले नाही. जेव्हा मला कोरोना आजाराचा त्रास होण्यास सुरूवात झाली त्यावेळेस मी स्वत:ह छत्रपती शिवाजी महारज रूग्णालयात दाखल झाले. मात्र सध्या कोरोना बाधित रूग्ण आहेत ते जास्त घाबरत आहेत. त्यांनी घाबरून जाऊ नये त्यांना जर कोणत्याही प्रकारचे कोरोनाची लक्षणे दिसत असले तर लगेच त्यांनी उपाचारासाठी सिव्हील हॉस्पीटलला जावे. तसेच सध्याचा काळ खराब आहे. घरात बसून आयुर्वेदात किंवा आपल्या डॉक्‍टरांच्या सल्लानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधे, व्यायाम, जेवणात बदल करावा जेणेकरून या आजाराचा सामना करावा लागणार नाही. 

कोरोना बाधित रूग्णांना दोन प्रकारच्या गोळ्या देण्यात येतात. त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या गोळ्या असतात. रेल्वे हॉस्पीटलमध्ये आहे या ठिकाणी रूग्णांची चांगल्या प्रकारे देखरेख ठेवली जाते. या ठिकाणी कोरोना बाधित रूग्णांना सकाळी दूध, अंडी, केळी नाष्ट्या मध्ये पोहे, उप्पीट दिले जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शेंगा, काजू, बदमा, खोबऱ्याची चिक्की देण्यात येत होती. 

सिव्हिलमध्ये अस्वच्छता खटकलीच. तरीही रूग्णांनी या ठिकाणी आल्यावर घाबरून जाता काम नये. ज्यांना कोरोना रोगाची नुकतीच लागण झाली आहे आणि जे शेवटची घटका मोजत आहेत असे सर्व रूग्ण एकत्रीत असल्याने रूग्णांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे, हे ही मला पदोपदी जाणवले. यात सुधारणा व्हावी...! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT