सोलापूर : सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून सारिका अक्षय ढेकळे यांनी दोन चिमुकलींसह आत्महत्या केल्याची बाब पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पती अक्षय ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे व दीर अण्णासाहेब उत्तम ढेकळे (सर्वजण रा. पाथरी, ता. उत्तर सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
विवाहात मानपान केला नाही, चांगला आहेर केला नाही, सोने दिले नाही याचा राग मनात धरून पतीसह कुटुंबातील व्यक्तींनी वारंवार अपमान केला. नवीन कपडे घेऊन न देणे, उपाशी ठेवणे, माहेरी न पाठविणे, फोनवर माहेरी बोलू न देणे अशा बाबींना कंटाळून सारिका हिने तिच्या दोन्ही मुलींसह आपले जीवन संपवले. सुरवातीला मयताच्या पतीने शेतात पाखरे राखायला गेल्यानंतर त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्या तिघींचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने सखोल तपास सुरू केला होता.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डी. एस. दळवी यांनी त्यासंबंधीची चौकशी केली. तत्पूर्वी, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली होती. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. त्यानंतर मयताचा पती अक्षय उर्फ आकाश ढेकळे, सासरा उत्तम मच्छिंद्र ढेकळे, अनिता उत्तम ढेकळे, अण्णासाहेब उत्तम ढेकळे, पूजा अण्णासाहेब ढेकळे, विलास सुरवसे, सोजरबाई विलास सुरवसे, साळुबाई बाळा गुंड, बाळा गुंड आणि छकुली यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यातील पती, सासरा व दिराला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. यामध्ये संशयित आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक यांनी तर सरकारतर्फे ॲड. बनसोडे यांनी काम पाहिले.
दोन्ही मुली झाल्याने अपमानास्पद वागणूक
संशयित आरोपींना न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सारिका ढेकळे यांना सलग दोन मुलीच झाल्याने सासरच्यांनी त्यांचा छळ सुरु केला होता, ही माहिती समोर आली आहे. अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मयत सारिकाच्या सासरच्यांनी तिला दोन मुलीच झाल्याने त्रास द्यायला सुरू केला होता. मयताची आई त्यांचा कौटुंबिक वाद मिटवायला शुक्रवारी (ता. २१) मुलीच्या सासरी आल्या होत्या. त्या त्यांच्या गावी गेल्यानंतर काही वेळातच सारिकाने दोन्ही मुलींसह आत्महत्या केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.