ST Bus Turn Over sakal
सोलापूर

Pimpalner Accident : चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस पलटी होऊन अपघात; 28 प्रवासी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कुर्डूवाडी आगाराची वैराग-पुणे स्वारगेट एसटी बस कुरडवाडी टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर येथे पलटी होऊन झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले.

सुहास कांबळे

पिंपळनेर - चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कुर्डूवाडी आगाराची वैराग-पुणे स्वारगेट एसटी बस कुरडवाडी टेंभुर्णी रस्त्यावरील पिंपळनेर येथे आज पलटी होऊन झालेल्या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. पैकी दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना तातडीने कुरडवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतचे वृत्त असे, कुर्डूवाडी आकारातून सुटणारी वैराग पुणे स्वारगेट एमएच 14 बीटी ०९७२ ही बस कुरडवाडीहुन पुण्याकडे जात असताना पिंपळनेर येथील शिंदे पोल्ट्री फार्मजवळ येताच बस चालक नवनाथ कळसाईत (वय-45) यांना अचानक चक्कर आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रोड लगतच्या शेतातील चारीत पलटी झाली. सकाळी पावणेदहा वाजता ही घटना घडली असून बसमध्ये एकूण 55 प्रवासी प्रवास करीत होते.

घटनास्थळी इंदापूरचे सकाळ प्रतिनिधी संतोष आटोळे यांनी तातडीने माहिती दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. बसमधील सर्व जखमींना तातडीने कुरवडे येथील प्रथमिक आरोग्य केंद्र व खाजगीर होणाऱ्या दाखल करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी नियुक्त असलेले रविकरण कदम मंडळ अधिकारी विशाल गायकवाड, सूर्यकांत डिकोळे, कुदळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चेलावा, हरिदास पाटील, शिवाजी कांबळे, दीपक घोरपडे, हरिश्चंद्र चाचणी, सिद्धनाथ लवटे, पोलीस पाटील राहुल पेठकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय डांगे, उपसरपंच यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढले.

जखमींची नावे मारुती कुठे (वय 75) वाई, कलावती चव्हाण, वाई, सातारा. रंजना सावंत अंजनगाव माढा, छाया दत्तात्रय वाघ (वय 75) वैराग, मंगल कार्यास खंडागळे (वय 55) तडवळे. माणिक सर्जेराव चव्हाण (वय 85) जामगाव, माढा, ज्ञानदेव खंडागळे (वय 76) तडवळे, सज्जन बेरड (वय 24) भुताष्टे, कुसुम भगवान चौरे (वय 73) वैराग, अंगत पांडुरंग हजारे (वय 54) पुणे. पार्वती सुभाष कोळी (वय 60) भिमानगर. लता हजारे (वय 40) हिंगणगाव, नवनाथ दशरथ कांबळे (वय 75) वैराग. स्वाती यल्लाप्पा बनसोडे (वय 32) पुणे. रणजी पाटलाप्पा बनसोडे (वय 10) पुणे. रोहन गरड (वय 21) बार्शी. शिवम राहुल खांडेकर उपळाई, शारदा नवनाथ कांबळे (वय 72) वैराग, विलास अंबादास शिंदे (वय 56) भोसरे, दशरथ चाबुकस्वार (वय 75) हातीस बार्शी, लता मोतीराम शिंदे (वय 41) शिंगेवाडी, सुदामती नागटिळक (वय 75) बार्शी, उस्मान शेख (वय 69) खामगाव बार्शी, नागेश जोशी (वय 65) वैराग, शोभा सोनवणे (वय 46) शहनाज मुंडे (वय 50) अर्चना खटके (वय 41) वैराग, अमोल गळके (वय 24) माढा आदी जखमी आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून बसच्या पाठीमागील काच फोडून जखमींना तरुणांनी सुखरूप बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेतील वाहन चालकाच्या छातीवर हाताने दाबून श्वास सुरू करण्यास मदत कार्य करणाऱ्यांना यश मिळाले. एसटी महामंडळाकडून किरकोळ जखमींना तातडीची प्रत्येकी पाचशे रुपये व एक हजार रुपयांची मदत आगार व्यवस्थापक रत्नाकर लाड यांनी जखमीची चौकशी करत उपचारासाठी तातडीने केले प्रयत्न.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT