ST services resumed convenience of students parents and passengers Diwali and mid-term exams Sakal
सोलापूर

Maratha Reservation : एसटीसेवा पूर्ववत सुरू; प्रवाशांमधून समाधान

दिवाळी अन्‌ सहामाही परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक अन्‌ प्रवाशांची सोय

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांनी गुरुवारी (ता. २) राज्य सरकारशी झालेल्या वाटाघाटीनंतर आपले आंदोलन २ जानेवारीपर्यंत मागे घेतले आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने एसटी बससेवा शुक्रवारी (ता. ३) सकाळपासूनच पूर्ववत सुरू केली आहे. दिवाळीच्या तोंडावर बससेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी (३० ऑक्टोबर) भंडिशेगाव (ता. पंढरपूर) येथे एसटीची बस पेटवून दिली होती. त्यामुळे एसटी प्रशासनाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पंढरपूर बस आगारातून मागील काही दिवसांमध्ये एकही बस सोडण्यात आली नव्हती. परजिल्ह्यांतून आलेल्या बस देखील पंढरपूर बस आगारामध्येच थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी एसटी बसने पंढरपूरमध्ये आलेले भाविक बस स्थानकामध्ये अडकून पडले होते. मात्र, आता मराठा आंदोलन मागे घेण्यात आल्याने एसटी महामंडळाने आपली बससेवा पूर्ववत सुरू केली आहे. ऐन दिवाळी व शाळांच्या सहामाही परीक्षांच्या तोंडावर एसटी सेवा सुरळीत झाल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील तीन दिवसांमध्ये बसच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, आता मराठा आंदोलन मागे घेतल्याने शुक्रवारपासून एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

- पंकज तोंडे, प्रमुख, पंढरपूर बसस्थानक प्रमुख

आम्ही मागील शनिवारी नागपूरहून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो होतो. मात्र एसटी सेवा बंद असल्यामुळे पंढरपूरमध्येच अडकून पडलो होतो. आज बससेवा सुरू झाल्यामुळे परतीच्या प्रवासाला निघालो आहोत.

- शहाजी मेंदेकर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT