बोंबा मारत केली एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन-बदली नोटिसांची होळी esakal
सोलापूर

बोंबा मारत केली एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन-बदली नोटिसांची होळी

बोंबा मारत केली एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन-बदली नोटिसांची होळी

विजय थोरात

सोलापूर विभागातील आतापर्यंत 300 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर 28 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली.

सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers) राज्य शासनात (Maharashtra State Government) विलीन करा, या मुख्य मागणीसाठी सोलापूर (Solapur) विभागातील एसटी कर्मचारी 4 नोव्हेंबरपासून संपावर (ST Strike) गेले आहेत. दिवसेंदिवस संपाची तीव्रता वाढत आहे. नवीन वेतनवाढ मान्य असलेले काही कर्मचारी कामावर रुजू होत असून, उर्वरित कर्मचाऱ्यांना निलंबन, बदलीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र संतप्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 9) दुपारी कर्मचारी विभागीय कार्यालय परिसरात प्रशासनाच्या विरोधात बोंब मारून निलंबन आणि बदलीच्या नोटिसांची होळी केली.

मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ केली. मात्र, कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने कर्मचारी संप मिटविण्याच्या भूमिकेत नाहीत. परंतु राज्य शासनाकडून विलिनीकरण होत नसल्याने संप सुरूच ठेवण्यावर कर्मचारी ठाम आहेत. सोलापूर विभागातील काही आगारातून मागील आठवड्यापासून एसटी वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागातील आतापर्यंत 300 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर 28 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली असून, 150 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

मात्र मागील काही दिवसांपासून एसटीची वाहतूक सुरू झाली असली तरी चालक आणि वाहकांची कामावर रुजू होण्याची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या नोटिशीला कर्मचारी भीक घालणार नाहीत आणि त्यामुळे आम्ही आमच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली तरी आम्ही मागे हटणार नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिल्या. एसटी प्रशासनाने संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबन आणि बदलीच्या नोटिसा दिल्या आहेत. या कारवाईमुळे संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या संपात चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी व प्रशासकीय कर्मचारी सहभागी आहेत.

निलंबनात चालक-वाहकांची संख्या अधिक

सोलापूर विभागात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक चालक, वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील आतापर्यंत 300 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये चालक आणि वाहकांची संख्या सर्वाधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर यांत्रिकी, प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्‍त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT