आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी या योजनेसाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता.
सोलापूर : भीमा-सीना जोडकालव्यासाठी (Bhima-Sina River Project) ०.५११ टीएमसी पाण्याच्या तरतुदीस राज्य सरकारने मंगळवारी (ता. १) मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीना नदीवरील एकूण ५३ किमी लांब परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी या योजनेसाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात भीमा नदीवरील (Bhima River) वडापूर बंधाऱ्यातून खाली सुमारे ६० ते १०० टीएमसी अतिरिक्त पाणी वाहून जाते. त्यामुळे या नदीवर वडापूर येथे बॅरेज बांधून हे पाणी बोगद्याद्वारे सीना नदीत सोडले जाणार आहे. पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार असल्याने आता बारमाही सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. वडापूर बॅरेजसाठी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
वडापूर बॅरेजमधून जोडकालव्याद्वारे १४.४७ दशलक्ष घनमीटर इतके पाणी सीना नदीत येणार आहे. सीना नदीवर नंदूर, वडकबाळ, सिंदखेड, बंदलगी, कोर्सेगाव व कुडल येथे असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या सहा बंधाऱ्यांत उजनीचे पाणी येणार आहे. या जोडकालव्याची लांबी १८ किलोमीटर असून सिनेवरील अकोले (मंद्रूप) बंधारा ते कुडल संगमपर्यंतचे अंतर ३५ किलोमीटर आहे.
या वाढीव ०.५११ टीएमसी पाण्याचा नंदूर, समशापूर, डोणगाव, तेलगाव, अकोले (मं.), गुंजेगाव, पाथरी, वांगी, मनगोळी, वडकबाळ, हत्तूर, सिंदखेड, बिरनाळ, चंद्रहाळ, होनमुर्गी, बंदलगी, औराद, राजूर, संजवाड, बोळकवठा, हत्तरसंग, चिंचोली, कोर्सेगाव, कुमठा, केगाव, कल्लकर्जाळ या गावांच्या पिण्यासह शेती सिंचनासाठी लाभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.