state govrnment debt 
सोलापूर

राज्याच्या तिजोरीत खडखडाट : राज्य सरकारने काढले 30 हजार कोटींचे कर्ज

तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारच्या तिजोरीवरील कर्जाचा भार वाढतच असून 2019- 20 मध्ये अपेक्षित उत्पन्नात दरमहा तीन ते साडेतीन हजार कोटींची तूट सोसावी लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यंदा 30 हजार कोटींचे कर्ज घेऊन महसुली खर्च भागवला आहे. 

मंदीमुळे यंदा 42 ते 45 हजार कोटींपर्यंत महसुली तूट
ऑक्‍टोबर 2016 मध्ये केंद्र सरकारने केलेली नोटबंदी आणि त्यानंतर देशात लागू केलेल्या वस्तू व सेवाकर या नव्या करप्रणालीमुळे मागील दोन वर्षात राज्य सरकारला आर्थिकदृष्टया कसरत करावी लागत आहे. त्यातच केंद्र सरकारकडून येणारा विविध करापोटीचे अनुदानही वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. 2013-14 मध्ये पाच हजार 81 कोटींची तर 2014-15 मध्ये 12 हजार 138 कोटींची, 2015-16 मध्ये पाच हजार 338 कोटी तर 2016-17 मध्ये आठ हजार 536 कोटी आणि 2017-18 मध्ये 14 हजार 843 कोटी तर 2018-19 मध्ये 15 हजार 375 कोटींची महसुली तूट सोसावी लागली. जागतिक मंदीमुळे यंदा सलग दहा महिन्यांपासून दरमहा तूट सहन करावी लागल्याने महसुली खर्च भागवण्यासाठी सरकारने 30 हजार कोटींचे बाहेरील कर्ज घेतले आहे. एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत सरकारला दोन लाख 31 हजार कोटींचे महसुली उत्पन्न मिळाले, परंतु प्रत्यक्षात दोन लाख 63 हजार कोटींपर्यंत महसूल जमा होणे अपेक्षित होते. मंदीमुळे यंदा 42 ते 45 हजार कोटींपर्यंत महसुली तूट येईल आणि महसुली तूट पाहता नव्या कर्जमाफीसह अन्य नव्या योजनांसाठी आणखी 50 ते 60 हजार कोटींचे कर्ज काढावे लागेल, असेही वित्त विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले. 


केंद्राकडील अनुदानाच्या रकमेसाठी पाठपुरावा 
2019-20 मध्ये तीन लाख 14 हजार कोटींचे महसुली उत्पन्न अपेक्षित आहे. डिसेंबरअखेर दोन लाख 15 हजार कोटींचा महसुली जमा झाला आहे. दरमहा महसुलात घट झाली असल्यामुळे राज्य सरकारने 30 हजार कोटींचे बाहेरील कर्ज काढले आहे. आता मार्चमध्ये मोठा महसूल जमा होईल अशी आशा असून केंद्राकडील अनुदानाची रक्कमही मिळेल अशी अपेक्षा आहे.  
- राजीव मित्तल, सचिव, वित्त 


राज्याची स्थिती 
यंदाचे अपेक्षित उत्पन्न 
3.14 लाख कोटी 
जानेवारीपर्यंत महसुली जमा 
2.31 लाख कोटी 
जानेवारीपर्यंत अपेक्षित उत्पन्नात तूट 
32,000 कोटी 
दोन महिन्यात वसुलीचे उद्दिष्टे 
83,000 कोटी 
बाहेरील कर्जात यंदा वाढ 
30,000 कोटी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

Beed Assembly Election 2024: बीड विधानसभेच्या बंडखोर अपक्षांनी पळविले तोंडचे पाणी!

Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT