सोलापूर : सोलापूर शहरात १ जानेवारी ते २७ मे या चार महिन्यात ६१ घरफोड्या, ११ जबरी चोऱ्या व इतर ८७ चोरीचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे मागील १२१ दिवसांत शहरातून १६३ वाहनांची चोरी झाली आहे. शहर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांनी चार महिन्यातील घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी व इतर चोरीच्या ३२२ गुन्ह्यांमधील १९० गुन्ह्यांचा छडा लावला असून उर्वरित गुन्ह्यांचा तपास अजूनही सुरूच आहे.
सोलापूर शहरात मागील २७ दिवसांत (१ ते २७ मेपर्यंत) घरफोडी, वाहन चोरी, जबरी चोरी व इतर चोरीचे ७० गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये ३२ लाख ४६ हजार ९०३ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पण, सर्व पोलिस ठाण्यांकडील गुन्हे प्रकटीकरण पथकांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी त्यातील ६६ गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. ही सर्व कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्यासह सात पोलिस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी कर्नाटकातील सराईत गुन्हेगार शाहु ऊर्फ शरणप्पा सिद्धप्पा काळे या तरुणाला अटक करून त्याने केलेल्या चार घरफोड्यांमधील अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर सदर बझार पोलिसांकडील गुन्ह्यातील चार आरोपींना पकडून शहर गुन्हे शाखेने उत्तर तहसील कार्यालयातून पळवलेला ट्रॅक्टर व दोन ट्रॉली जप्त केली. तरीपण, जानेवारी ते मे या चार महिन्यातील १३२ गुन्ह्यांचा तपास पोलिसांना अद्याप लागलेला नसून चोरट्यांचा शोध सुरूच आहे.
साडेतीन वर्षातील गुन्ह्यांची स्थिती (जानेवारी ते मेपर्यंत)
(२०२१)
घरफोडी
५३
जबरी चोरी
१२
वाहन चोरी
१११
इतर चोरी
९६
एकूण
२७२
----------------------------------------------------------------------------------------
(२०२२)
घरफोडी
४९
जबरी चोरी
१४
वाहन चोरी
१४५
इतर चोरी
११७
एकूण
३२५
-----------------------------------------------------------------
(२०२३)
घरफोडी
६०
जबरी चोरी
१६
वाहन चोरी
१७८
इतर चोरी
९३
एकूण
३३०
------------------
२०२४
घरफोडी
६१
जबरी चोरी
११
वाहन चोरी
१६३
इतर चोरी
८७
एकूण
३२२
कल्याणवरून रेल्वेने रविवारी यायचा अन् दिवसा घरफोड्या करून जायचा
कल्याण येथील सराईत चोरटा सॅमसन रूबीन डॅनियल (वय २५) हा दर रविवारी रेल्वेने सोलापुरात यायचा. त्या दिवशी बंद घरांमध्ये दिवसाच चोरी करून पुन्हा रात्री रेल्वेने कल्याणला जात होता. विजापूर नाका पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारीचा बारकाईने अभ्यास करून डॅनियलला पकडले. त्याने पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली.
‘त्या’ महिला चोरीसाठी घालायच्या बुरखा
शहरातील फौजदार चावडी, सदर बझार व जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराफ दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या तीन बुरखाधारी महिलांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडील तपासातून आतापर्यंत चार गुन्ह्यांचा तपास लागला असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठीच त्या महिला बुरखा घालून जायच्या आणि दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलीत करून दागिने चोरी करायचे, अशी बाब तपासात समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.