सोलापूर : कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना देशभरात तीन महिने लॉकडाउन करण्यात आला होता. या लॉकडाउनच्या कालावधीत सर्व उद्योग, खासगी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हे लॉकडाउन शिथिल करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना सरकारी कार्यालय किंवा खासगी आस्थापने सुरू झाली आहेत. या ठिकाणी प्रत्येकाला थर्मल स्क्रिनिंग करून सोडले जाते. मात्र, यात काही त्रुटी असण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग व्हावे आणि तापमान तपासले जावे यासाठी एक हेड बॅंड तयार करण्यात आला आहे.
मूळचे सोलापूरचे मात्र सध्या व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक असणारे चंद्रबदन चंडक यांनी हा हेड बॅंड तयार केला आहे. आज आपण जेथे जातो तेथे थर्मल स्क्रिनिंग केली जाते. परंतु या पद्धतीत बऱ्याच त्रुटी होण्याचा संभव आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. या प्रणालीमधल्या काही त्रुटी इन्फ्रारेड थर्मोमीटर आणि कपाळ यामध्ये अंतर कमी किंवा जास्त असणे, फार गर्दीच्या ठिकाणी वेळेअभावी स्कॅनिंग नीट न होणे, तापमान तपासणाऱ्या व्यक्तीची कार्यक्षमता क्षीण होणे आणि अशी बरेच कारणे या सर्व त्रुटी लक्षात घेऊन व त्या कमतरता भरून काढण्यासाठी या हेड बॅंडची निर्मिती करण्यात आली.
हा हेड बॅंड प्रत्येक व्यक्तीचे तापमान सहजरीत्या तपासण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. परंतु, यासाठी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही. हेड बॅंड तीन पद्धतीने मनुष्याचे तापमान दर्शवितो. ज्यामध्ये डिजिटल, कलर डिस्प्ले आणि साउंड या तिन्ही पद्धतींचा समावेश यात आहे. हेड बॅंडमध्ये तापमान मोजण्याचे सेन्सर किंवा इन्फ्रारेड प्रणालीचा वापरण्यात आला आहे. या पद्धतीमुळे तापमान मोजताना, ज्या व्यक्तीचे तापमान मोजले जातेय आणि जी व्यक्ती तापमान बघतेय यांमध्ये "मॅक्सिमम सोसिअल डिस्टन्स' ठेवणे सहज जमणार आहे. तापमान तीन पद्धतीने दर्शविल्यामुळे ताप असलेला व्यक्ती कधीही सुटून जाऊ शकत नाही आणि यामुळे व्हायरस पसरणे सहज आटोक्यात येणार आहे. तसेच ताप असलेल्या व्यक्तीवर त्वरित उपचार करणे शक्य होईल. हेड बॅंड सर्व वयोगटातील लोक वापरू शकतात. हेड बॅंडचा विशेष फायदा गर्दीच्या ठिकाणी होणार आहे, रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालय, शॉपिंग मॉल आणि गर्दीचे ठिकाण वापरता येईल. हे सर्वसामान्यांना परवडणारे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.