सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीसह सरकारी व खासगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व त्याठिकाणचे वस्तीगृहे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ग्रंथालयांनाही टाळे ठोकण्यात आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
हेही नक्की वाचा : 'कोरोना'बद्दल अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर वॉच
राज्यातील अधिवेशन, शासकीय कार्यशाळा, चर्चासत्रे, ग्रंथोत्सोव असे कार्यक्रम बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रंथालयांमधील ग्रंथांची देवघेव, ग्रंथालय सेवा, अभ्यासिका, वाचन कक्ष बंद ठेवली जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. महाविद्यालये, विद्यापीठांमधील अभ्यासिकाही मार्चएण्डपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. दरम्यान, प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा नियोजित वेळेतच घ्याव्यात, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके यांनी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही नक्की वाचा : बळीराजाचा हताश ! अवकाळीचे पंचनामेच नाहीत
अकृषी विद्यापीठेही 31 मार्चपर्यंत राहणार बंदच
चीनमधील कोरोना या विषाणूजन्य आजाराचे आगमन राज्यात झाले असून रुग्णांची संख्या आता 31 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये माचएण्डपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. दरम्यान, अकृषी विद्यापीठेही बंद ठेवावीत, असे आदेश उपसचिव सतीश तिडके यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरु, कुलसचिवांना दिले आहेत. परीक्षा वगळता अध्यापनासह अन्य कामकाज बंद ठेवले जाणार असून विद्यापीठांमधील सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.
हेही नक्की वाचा : बळीराजाची कोंडी ! कर्जमाफीनंतरही 39 लाख शेतकरी थकबाकीतच
वस्तीगृहातील मुलांना त्यांच्या गावी हलविले
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सशंयीतांवर उपचाराची सोय करण्यात आली आहे. तर वाडीया हॉस्पिटल, केगाव व रेल्वेच्या दवाखान्यात संशयीतांना निगराणीखाली ठेवले जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील वस्तीगृहांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी हलविण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.