जुना पूना नाका परिसरात शुक्रवारी खंडागळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
सोलापूर : पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करतो म्हणून पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे (Sub-Inspector of Police Rohan Khandagale) याने साडेसात लाखांची लाच घेतली. जुना पूना नाका परिसरात शुक्रवारी खंडागळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सलगर वस्ती पोलिस ठाण्यामध्ये खंडागळे हा कार्यरत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे (Police Inspector Kavita Musle) यांनी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार (Senior Police Inspector Sampat Pawar) हेही संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. (Sub-inspector of police in Solapur took a bribe of Rs 7.5 lakh)
शेतातून विनापरवाना मुरूम उचलल्याप्रकरणी एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी कंत्राटदाराच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात (Salgar Vasti Police Station) फिर्याद दिली होती. दरम्यान, त्या शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपीच्या दोन गाड्या जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केल्या होत्या. गाड्या सोडून देणे आणि गुन्हा मागे घेण्यासंदर्भात मदत करतो म्हणून पोलिस उपनिरीक्षक खंडागळे याने तक्रारदाराकडे साडेसात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क करून यासंदर्भातील तक्रार केली. एवढी मोठी लाचेची संपूर्ण रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने खंडागळे याला रंगेहाथ पकडले. या गुन्ह्यामध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत का, याचा तपास त्याच्या कॉल रेकॉर्डिंगवरून लाचलुचपत विभागाचे अधिकारी घेत आहेत. त्याचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली.
खंडागळे होता साप्ताहिक सुट्टीवर
सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे याच्याकडे त्या शेतकऱ्याच्या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खंडागळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे पोलिस उपनिरीक्षक खंडागळे याची शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी होती, असेही सांगण्यात आले. तक्रारदाराकडून खंडागळे याने एकाचवेळी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेतली. या वेळी त्याला लाचलुचपत विभागाने पकडल्याची माहितीही या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एवढी मोठी लाचेची रक्कम घेतल्याची शहर-ग्रामीण पोलिस दलातील ही पहिलीच घटना आहे.
लाच स्वीकारण्यात दोषी असलेल्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे तत्काळ निलंबित केले जाईल.
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.