सोलापूर

सावधान.. समोर येताहेत चाइल्ड पॉर्नोग्राफीतील काळे चेहरे!

परशुराम कोकणे

सोलापूर : चाइल्ड पॉर्नोग्राफीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी हाती घेतलेल्या "ऑपरेशन ब्लॅक फेस' मोहिमेला चांगले यश मिळत आहे. ऑपरेशन ब्लॅक फेस अंतर्गत दोन महिन्यांत राज्यभरातून 1680 चाइल्ड पॉर्नोग्राफीची प्रकरणे शोधून काढली असून, आजपर्यंत 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर 38 जणांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम कायम चालू राहणार असून चाइल्ड पॉर्नोग्राफीवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

आईला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू

महाराष्ट्रात मुंबई शहर आघाडीवर
चाइल्ड पॉर्नोग्राफीत महाराष्ट्रात मुंबई शहर आघाडीवर आहे. येथे 653 तक्रारींत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर एकास अटक करण्यात आली आहे. त्याखालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागतो. पुण्यात 542 तक्रारींत पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. सोलापूर शहरात नऊ प्रकरणांत एक गुन्हा दाखल करून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ऑपरेशन ब्लॅक फेस ही मोहीम 5 जानेवारी 2020 पासून हाती घेतली. दोन महिन्यांत महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पथकाने राज्यभरातून 1680 चाइल्ड पॉर्नोग्राफी संदर्भातील प्रकरणे समोर आणली आणि संबंधित शहर आणि जिल्हा पोलिसांना त्याबाबतचा अहवाल पाठवला. त्यानुसार राज्यभरात स्थानिक पातळीवर तपास करून 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 38 जणांना अटक करण्यात आली आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 

व्हॉट्‌सऍपचे हे शॉर्ट की तुम्हाला माहित आहेत का?

राज्यभरातून 1680 व्हिडिओ अश्लील इंटरनेटवर आढळले
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र सायबरचे पोलिस अधीक्षक बालसिंग रजपूत आणि त्यांच्या पथकातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ऑपरेशन ब्लॅक फेस राबविले जात आहे. मोहिमेत राज्यभरातून 1680 अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर आढळले आहेत. मोहिमेअंतर्गत व्हिडिओ अपलोड करणाऱ्या तसेच व्हिडिओ शेअर करणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. 

- चाइल्ड पॉर्नोग्राफीत दिल्लीनंतर महाराष्ट्राचा क्रमांक. 
- 55 दिवसांत सापडली चाइल्ड पॉर्नोग्राफीची 1680 प्रकरणे. 
- राज्यभरातून 38 जणांना केली अटक. 
- देशात महाराष्ट्र सायबर पोलिसांची चांगली कामगिरी. 
- ऑपरेशन ब्लॅक फेस अंतर्गत सोशल मीडियावर वॉच.

चाइल्ड पॉर्नोग्राफी रोखण्यासाठी आम्ही ऑपरेशन ब्लॅक फेस मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम कायम चालू राहणार आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पथकाने दोन महिन्यांत जवळपास चाइल्ड पॉर्नोग्राफीची 1680 प्रकरणे समोर आणली असून संबंधित पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. चाइल्ड पॉर्नोग्राफीचे प्रमाण देशात सगळीकडेच आहे, पण सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल होत आहेत. चाइल्ड पॉर्नोग्राफी हा गंभीर गुन्हा आहे. बालकांचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ काढले जात असतील, ते सोशल मीडियावर शेअर केले जात असतील तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी. जर तुम्हाला चाइल्ड पॉर्नोग्राफीची माहिती आहे, पण तुम्ही माहिती दिली नाही तर तोही गुन्हा ठरतो. 
- बालसिंग राजपूत, 
पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मगरी, शार्क असलेल्या नदीत पडले Ian Botham; ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने वाचवले अन्यथा...

Latest Maharashtra News Updates : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याकांचा दर्जा - SC

Sawantwadi Election : शिवसेनेच्या उमेदवारीवर नारायण राणे शेवटचे लढले, अटीतटीची 'ती' निवडणूक ठरली लक्षवेधी

Beed Assembly Election 2024: बीड विधानसभेच्या बंडखोर अपक्षांनी पळविले तोंडचे पाणी!

Jayant Patil : 'महायुतीच्या त्रिकुटाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला'; जयंत पाटलांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT