sugarcane bill from shinde factory transfer to farmers babanrao shinde Sakal
सोलापूर

Babanrao Shinde : जळीत उसाची प्रतिटन कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत देणार; बबनराव शिंदे

आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर1 पिंपळनेर व युनिट नंबर 2 करकंब येथील सन 2023-24 चा गळीत हंगाम नुकताच बंद झालेला आहे.

संतोष पाटील

टेंभुर्णी : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर 1 पिंपळनेर व युनिट नंबर 2 करकंब या कारखान्याने सन 2023-24 गळीत हंगामामध्ये जळीत होवून गाळपास आलेल्या ऊसाचे बिलातून कारखाना धोरणानुसार कपात केलेली संपूर्ण रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-यांना परत करण्यात येणार असल्याची माहीती संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर1 पिंपळनेर व युनिट नंबर 2 करकंब येथील सन 2023-24 चा गळीत हंगाम नुकताच बंद झालेला आहे.या गळीत हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे 1 नोव्हेंबर 2023 ते 6एप्रिल 2024 या कालावधीत ज्या ऊस पुरवठादारांचा ऊस शॉर्टसर्कीट,

नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे जळीत होवून गळीतास आला आहे. त्यांचे ऊसाचे बिलातून कारखाना धोरणाप्रमाणे प्रतिटन रक्कम कपात करण्यात आली आहे. सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून शेतक-यांना पिण्याचे पाणी,

जनावरांचे चा-याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतक-यांना दिलासा देणेच्या दृष्टीने ऊस बिलातून कपात करण्यात आलेली जळीताची शंभर टक्के रक्कम ऊस पुरवठादारांना परत करण्यात येणार आहे.

जळीत ऊसाची कपात रक्कम सभासद शेतक-यांना परत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. जळीत कपात रक्कमेमध्ये युनिट नंबर 1 पिंपळनेर येथील 3 कोटी 94 हजार रूपये व युनिट नंबर 2 करकंब येथील 90 लाख 29 हजार रूपये असे एकूण 3 कोटी 91 लाख रूपये एवढ्या रक्कमेचा समावेश आहे.

सदर जळीत ऊसाची कपात रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात येत्या दोन ते चार दिवसात वर्ग करण्यात येणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे हित जोपासणेचा प्रयत्न केलेला आहे.

दोन्ही युनिट कडील सन 2023 - 24 चा गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ठ पार पाडण्यासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी सहकार्य केले असून पुढील सन 2024-25 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे द्यावेत असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन दिग्रजे ,जनरल मॅनेजर एस.आर.यादव व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT