Pets Diet in Summer : राज्यात कित्येक ठिकाणी तापमान ४० अंशावर गेल्याने पाळीव प्राण्याचे उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण या कालावधीत वाढते. त्यासाठी पशुपालकांनी पाळीव कुत्र्यांची आहारासह थंड ठिकाणी ठेवण्याची काळजी घ्यावी.
मुळातच पाळीव कुत्र्यांमध्ये बहुतांश कुत्री ही विदेशातील किंवा थंड प्रदेशात विकसित झालेल्या जाती आहेत. ही कुत्री वातावरणाशी जुळवून घेत असली तरी उन्हाचा कडाका मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्या तुलनेत गावठी कुत्री घाण पाण्यात किंवा डबक्यात बसून उन्हापासून सहजपणे आपला बचाव करू शकतात.
पण विदेशी जातीची कुत्री स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे उष्माघाताच्या एका झटक्यात ते मृत्यू पावण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. प्रत्येक कुटुंबाची पाळीव कुत्र्यासोबत भावनिक संबंध असल्याने कुत्र्याचा अचानक मृत्यू धक्कादायक ठरतो. त्यासाठी माणसांप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते.
पाळीव प्राण्यांमध्ये मांजराला उन्हाचा त्रास होत नाही. पण कुत्र्यांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. या स्थितीत माणसाप्रमाणे उन्हापासून कुत्र्यांचे संरक्षण केले पाहिजे. घरातील कुलरसमोर त्यालाही बसवले पाहिजे. बाथरूममध्ये कुत्री दिवसभर बसली तरी त्यांचे खूप चांगले संरक्षण होते.
- आशिष म्हेत्रे, पेट शॉप ओनर, सोलापूर
आपल्याकडील बहुतांश पाळीव कुत्री युरोपातील प्रजाती आहेत. त्यांना उष्णता सहन होत नाही. त्यांना थंड पाणी प्यायला द्यावे, पाण्याने अंघोळ घालावी व कुलर समोर किंवा बाथरूममध्ये बसू द्यावे.
- डॉ. प्रशांत परांडकर, पशुवैद्यक तज्ञ, उत्तर कसबा, सोलापूर
कुत्र्यांना उन्हात खायला काही देऊ नये. अगदी सकाळी त्यास खायला द्यावे. मात्र पाणी सतत देत राहावे. थंड ठिकाणी पाण्याने भिजवलेल्या बोंद्र्यावर बसविल्यास त्याला उन्हापासून दिलासा मिळतो.
- पवन आयवळे, अध्यक्ष, पेट शॉप असोसिएशन, सोलापूर
उन्हाच्या कडाक्याच्या आधी सकाळी ७ ते ८ दरम्यान कुत्र्याला खायला द्यावे
या दिवसात कुत्र्याचे खाणे कमी होते हे लक्षात घ्यावे
ऊन सुरु होताच त्याला कुलरसमोर बसवावे किंवा बाथरूममध्ये बसवावे
सुतळीपासून तयार केलेले पोते पाण्यात भिजवून त्यास बसण्यास द्यावे
कुत्र्यास भरपूर पाणी पिण्यास द्यावे
सायंकाळी उतरत्या उन्हात फिरवण्याऐवजी रात्री १० च्या सुमारास फिरवावे
दमछाक होईपर्यंत त्याला खेळवू नये, किंवा खेळवले नाही तरी चालते
कुत्र्याला दही भात द्यावा
ताक पिण्यास द्यावे
कलिंगडाचा गर खाण्यास द्यावा
चिकन किंवा अंडी देऊ नये
तयार ग्रेव्ही देण्यास हरकत नाही
पाण्यात इलेक्ट्रोल पावडर टाकून ते पाणी द्यावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.